अनिल कपूर होस्ट करणार नवा रियलिटी शो ‘इंडिया के टॉप 1%’; लवकरच येणार स्टार प्लस वर

स्टार प्लसने आपला नवीन रिअॅलिटी शो इंडिया के टॉप 1% ची घोषणा केली असून अनिल कपूर हा नवा कोरा शो होस्ट करणार आहे.

Untitled Design (35)

Untitled Design (35)

‘India’s Top 1%’; coming soon on Star Plus : टेलिव्हिजनवर एक गेम-चेंजर अनुभव घेण्यासाठी तयार व्हा! स्टार प्लसने आपला नवीन रिअॅलिटी शो इंडिया के टॉप 1% ची घोषणा केली असून अनिल कपूर हा नवा कोरा शो होस्ट करणार आहे. हा शो पारंपरिक बुद्धिमत्तेच्या संकल्पनांना आव्हान देण्यासाठी तयार करण्यात आला आहे. या शो मध्ये प्रेक्षक सहभागी होणार असून त्यांच्या लॉजिक आणि ऑब्झर्वेशन सोबत त्यांच्यातील झटपट निर्णय घेण्याच्या क्षमतेची कसोटी लागणार आहे. माहितीने भरलेल्या जगात ‘इंडिया के टॉप 1%’ एक वेगळा प्रश्न विचारतो – तुम्ही विचार करून टॉपवर पोहोचू शकता का? पारंपरिक क्विझ शोमध्ये पाठांतर केलेल्या गोष्टींना महत्त्व दिले जाते, पण ‘इंडिया के टॉप 1%’ चा फॉरमॅट वेगळा आहे.

या खेळामध्ये प्रेक्षकांची रिझनिंग, त्यांचा कॉमन सेन्स, मेंटल अॅजिलिटी आणि प्रेशरमध्ये शांत राहण्याची ताकद आजमावण्यात येणार आहे. प्रत्येक चॅलेंज खास डिझाइन केलेले आहे जेणेकरून स्पर्धक माहिती कशी प्रोसेस करतात, पॅटर्न ओळखतात, प्रॉब्लेम्स सोडवतात आणि सेकंदात निर्णय घेतात याची खरी परीक्षा होईल. स्पर्धा जसजशी तीव्र होते, तसतसे फक्त तीक्ष्ण बुद्धीचे लोकच इतरांपेक्षा वर उठतील. ते वाढत्या अवघड चॅलेंजेस पार करत अखेरीस त्यांना मिळेल एक अनोखी ओळख – भारताचे टॉप 1% थिंकर्स!

अजितदादांनंतर मुख्यमंत्र्यांचेही लाडके झालेत, तटकरेंकडे कोणतं लिंबू? रामदास कदमांचा हल्लाबोल

अनिल कपूर यांनी ‘इंडिया के टॉप 1%’ बद्दल बोलताना सांगितले की, “मी नेहमी मानतो की भारत ही अशी भूमी आहे जिथे लोकांचा रॉ इन्स्टिंक्ट, ऑब्झर्वेशन आणि स्ट्रीट-स्मार्टनेस अप्रतिम आहे. आपल्या देशातील कोणत्याही रस्त्यावर जा, तिथे तुम्हाला असे लोक भेटतील जे कोणालाही हरवू शकतात. कारण त्यांनी एन्सायक्लोपीडिया पाठ केलेली नसते, तर त्यांच्या जीवनानुभवाने त्यांची बुद्धी धारदार झालेली असते. भारतात आपण ‘जुगाडू’ असण्याचा अभिमान बाळगतो – हीच आपली खरी सुपरपॉवर आहे जी आपल्याला प्रत्येक क्षेत्रात टॉप 1% बनवते.

म्हणूनच जेव्हा मी ‘इंडिया के टॉप 1%’ चा फॉरमॅट पाहिला तेव्हा मला लगेच क्लिक झाले. हा शो तुम्हाला कोणत्या वर्षी कोणता करार झाला हे विचारत नाही, तर तुमचा मेंदू प्रेशरमध्ये किती लॉजिक आणि कॉमन सेन्स वापरतो हे तपासतो.” ते पुढे म्हणाले, “मला स्टार प्लसवर हा शो होस्ट करताना खूप आनंद होत आहे. आम्ही आपल्या लोकांना असा मंच देत आहोत जिथे ते आपली लॉजिकल पॉवर दाखवू शकतील, जी भारत आणि भारतीयांची खरी ओळख आहे. आणि मला यात भाग घेण्याचा अभिमान आहे.” अनिल कपूर होस्ट करत असलेला इंडिया के टॉप 1% लवकरच स्टार प्लसवर प्रेक्षकांच्या भेटीला येणार आहे.

Exit mobile version