Varun Tej Lavanya Tripathi Engagement : दाक्षिणात्य अभिनेता वरुण तेज (Varun Tej) आणि लावण्या त्रिपाठीचा (Lavanya Tripathi) नुकताच साखरपुडा पार पडला आहे. वरुणच्या हैदराबाद येथील घरी त्यांचा साखरपुडा पार पसल्याची माहिती मिळाली आहे. या साखरपुड्याला दाक्षिणात्य सिनेसृष्टीतील अनेक सेलिब्रिटींनी मोठ्या प्रमाणात हजेरी लावली होती. लावण्या त्रिपाठी आणि वरुण तेजच्या साखरपुड्याला अनेक दाक्षिणात्य सेलिब्रिटींनी मोठ्या प्रमाणात हजेरी लावली आहे.
अल्लू अर्जुन (Allu Arjun), राम चरण (Ram Charan) आणि सुपरस्टार चिरंजीवीने (Chiranjeevi) या साखरपुड्याला हजेरी लावत लावण्या आणि वरुणला शुभेच्छा दिल्या आहेत. आता लवकरच लावण्या आणि वरुण लग्नबंधनात अडकणार असल्याचे सांगितले जात आहे. लावण्या आणि वरुणने सोशल मीडियावर त्यांचे साखरपुड्याचे फोटो शेअर केले आहेत. फोटो शेअर करत वरुणने कॅप्शन लिहिले आहे की,”माझं प्रेम मला मिळाले”. तर लावण्याने देखील फोटो पोस्ट करत कॅप्शन दिले आहे. २०१६ मध्ये मला माझं प्रेम मिळालं आहे’.
लावण्याच्या या पोस्टने हे स्पष्ट होतं की, २०१६ पासून ती वरुणला तेजला डेट करत होती. गेल्या काही दिवसांपासून लावण्या आणि वरुणच्या अफेअरच्या जोरदार चर्चा रंगल्या होत्या. पण दोघांनी देखील कधीही याबद्दल भाष्य केले नाही. अखेर साखरपुडा करत त्यांनी चाहत्यांना आनंदाची बातमी दिली आहे. वरुण आणि लावण्याच्या पोस्टवर सेलिब्रिटींसह चाहत्यांनी देखील मोठ्या प्रमाणात कमेंट्स करत अभिनंदनाचा वर्षाव केला आहे. त्यांचे रोमँटिक फोटो सोशल मीडियावर सध्या जोरदार व्हायरल होत आहे.
वरुण तेज हा अभिनेता-निर्माता नागेंद्र बाबू यांचा मुलगा आहे. तसेत तो चिरंजीवी आणि पवन कल्याणचा भाचा आहे. तर लावण्या ही देखील दाक्षिणात्य सिनेसृष्टीतील लोकप्रिय अभिनेत्री आहे. तिने ‘अंदाला राक्षसी’ या सिनेमाच्या माध्यमातून २०१२ साली सिनेसृष्टीत पदार्पण केले होते. २०१७ साली आलेल्या ‘मिस्टर’ या सिनेमाच्या सेटवर त्यांची पहिली भेट झाली होती.
Tejasswi Prakash Birthday: इंजिनीअर होण्याचं स्वप्न बाळगलं अन् अभिनेत्री बनली! जाणून घ्या याबद्दल
‘मिस्टर’ सिनेमाच्या शूटिंगच्या दरम्यान वरुण आणि लावण्याची चांगली मैत्री झाली होती. पुढे त्यांच्या मैत्रीचे रुपांतर हे प्रेमात झालं आणि आता ते आता लग्नबंधनात अडकले आहेत. साखरपुड्यानंतर त्यांच्या लग्नसोहळ्याची चाहत्यांना मोठी प्रतीक्षा आहे. मिळालेल्या माहितीनुसार, वरुण आणि लावण्या लवकरच लग्नबंधनात अडकणार आहेत. या लग्नसोहळ्याला दाक्षिणात्य सिनेसृष्टीतील कलाकारांसह बॉलिवूड सेलिब्रिटीदेखील देखील मोठ्या प्रमाणात हजेरी लावणार आहेत.