Download App

आयरा-नुपूरच्या रिसेप्शनमध्ये CM शिंदेपासून ते सलमानपर्यंत ‘या’ दिग्गजांनी लावली हजेरी, आमिरनं केलं स्वागत

  • Written By: Last Updated:

Ira Khan And Nupur Shikhare Reception: काल रात्री अभिनेताआमिर खानची (Aamir Khan) मुलगी आयरा खान (Ira Khan)आणि नुपूर शिखरे (Nupur Shikhare) यांच्या लग्नाचं मुंबईत ग्रॅण्ड रिसेप्शन पार पडलं. या रिसेप्शन सोहळ्यला बॉलिवूड आणि बिझनेस जगतातील अनेक दिग्गजांनी हजेरी लावली होती. आयरा खान आणि नुपूर शिखरे यांच्या पार्टीला सलमान खान, शाहरुख खान, रेखा, जॅकी श्रॉफ, अनिल कपूर, कतरिना कैफ, सुष्मिता सेन, मोना सिंग यांसारख्या छोट्या-मोठ्या पडद्यावरील अनेक स्टार्सनी हजेरी लावली होती.

कोल्हापूर : परतीचा संदेश घेऊन पवारांचा दूत माजी मंत्र्यांच्या घरी; बंद दाराआड दीड तास खलबत 

३ जानेवारीला आयरा खान आणि नुपूर शिखरचे मुंबईतील ताज लँड्स एंड येथे रजिस्टर मॅरेज केलं. रजिस्टर मॅरेजनंतर दोघांनी उदयपूरमध्ये ख्रिश्चन रितीरिवाजानुसार लग्न केले. त्यानंतर काल त्यांनी रिसेप्शन पार्टी दिली. या जोडप्याची रिसेप्शन पार्टी लग्नापेक्षा भव्य होती. अलीकडेच या जोडप्याच्या लग्नाचा एक व्हिडिओ सोशल मीडियावर वेगाने व्हायरल होत आहे. या व्हिडिओमध्ये तुम्ही आयरा आणि नुपूरच्या रिसेप्शनची झलक पाहू शकता. या 10 सेकंदाच्या व्हिडिओमध्ये या कपलच्या रिसेप्शनच्या ते कोणकोणत्या पाहुण्यांनी रिसेप्शन पार्टीला हजेरी लावली, याची झलक पाहायला मिळतेय.

‘आपल्या दोघांत खूप साम्य, तुम्ही आमच्यासोबत’.. सूचक शब्दांत CM शिंदेंकडून देवरांचे ‘वेलकम’ 

रिसेप्शन दरम्यान नवविवाहित वधू आयरा खान लाल रंगाच्या लेहेंग्यात खूपच सुंदर दिसत होती. तिचा नवरा काळ्या रंगाच्या शेरवानीमध्ये एकदम डॅशिंग दिसत होता. या जोडप्याच्या पार्टीची थीम पांढरी आणि सोनेरी होती. थीम डोळ्यासमोर ठेवून सर्व सजावटीचे काम करण्यात आले. कार्यक्रमात पाहुण्यांचे मनोरंजन करण्यासाठी खास संगीत मैफलीचेही आयोजन करण्यात आले होते.

अनेक दिग्गज सहभागी झाले होते

या जोडप्याच्या आनंदात सहभागी होण्यासाठी सदाबहार अभिनेत्री रेखा, जया बच्चन, अनिल कपूर यांच्यासह अनेक स्टार्स आले होते. यासोबतच या काळातील सर्व कलाकारांनी अनेक स्टायलिश लूकमध्ये आपली उपस्थिती अनुभवली. आमिर खानची मुलगी आणि जावई यांना आशीर्वाद देण्यासाठी महाराष्ट्राचे मुख्यमंत्री एकनाथ शिंदेही पोहोचले होते.

मनसे अध्यक्ष राज ठाकरे आणि त्यांच्या पत्नी शर्मिला ठाकरे यांनीही रिसेप्शनला हजेरी लावत आयरा खान आणि नुपूर शिखरला शुभेच्छा दिल्या. याशिवाय आदित्य ठाकरेंसोबत रश्मी ठाकरे आणि तेजस ठाकरे यांनीही आयरा आणि नुपूरच्या रिसेप्शनला हजेरी लावली होती. मुकेश अंबानी आपल्या पत्नी नीता अंबानीसोबत आयराच्या रिसेप्शन पार्टीत सहभागी झाले होते.

follow us