Download App

Ishan Khattar लाईव्हचा कॅमेरा बंद करायचा विसरला अन् झालं असं काही…

Ishan Khattar live : अनेक अभिनेते, अभिनेत्री त्यांच्या सोशल मिडीयावर विशेषतः इंन्स्टाग्राम या प्लॅटफॉर्मवर लाईव्ह येत असतात. ते त्यांच्या चाहत्यांशी संवाद साधत असातात. तसेच अनेकदा त्यांच्या आगामी कामांबद्दल सांगतात. चित्रपटांचं प्रमोशन करत असतात. मात्र अनेकदा त्यांच्या या लाईव्हमध्ये अडचणी येत असतात. अशी एक चूक अभिनेता ईशान खट्टर याने केली. त्याने त्याच्या लाईव्हनंतर आपला कॅमेरा सुरूच ठेवला. त्यावरून त्याला नेटकऱ्यांनी चांगलच ट्रोल केलं. (Ishaan Khatter forgets to stop Instagram live, gets trolled )

Seema Haider: सीमा-सचिनच्या लव्हस्टोरीवर बनणार सिनेमा; नाव असेल ‘कराची ते नोएडा’

कॅमेरा बंद करायचा विसरला अन् झालं असं काही…

बॉलिवूड अभिनेता ईशान खट्टर याने इंन्स्टाग्राम अकाऊंटवर लाईव्ह आला होता. यावेळी त्याने त्याच्या चाहत्याशी संवाद साधला. मात्र यावेळी त्याने एक मोठी चूक केली. त्यावरून त्याच्यावर नेटकऱ्यांनी ट्रोलींग केलं. त्याच झालं असं की, ईशानचं लाईव्ह संपलं मात्र कॅमेरा तसाच सुरू राहिला. तर कॅमेरा सुरू असतानाच त्याने त्याच्या मित्राशी त्याला एक दुबईहून आलेल्या टिव्हीच्या ऑफबद्दल सांगत आहे. त्यावरून त्याला नेटकऱ्यांनी चांगलच ट्रोल केलं.

PM मोदींना मारून टाकू तसेच….; पुण्यातील व्यक्तीला आलेल्या धमकीनं खळबळ

काय म्हणाले नेटकरी?

नेटकऱ्यांनी त्याच्या या कृतीला मुद्दाम केलेली कृती म्हटलं आहे. तर त्याने हा कॅमेरा बंद आहे. अस समजून आपण बोलत आहोत हा त्याने बनाव केला. त्याला माहित होतं की लाईव्हचा कॅमेरा सुरू आहे. त्याला त्याचं प्रमोशन करायचं होतं. म्हणून तो त्याच्या मित्राशी त्याला एक दुबईहून आलेल्या टिव्हीच्या ऑफबद्दल बोलत होता. मात्र त्याच्या इतर अभिनयाप्रमाणे इथंही त्याने तसाच खाराब अभिनय केला. असं म्हणत नेटकऱ्यांनी त्याला ट्रोल केले. त्यामुळे त्याच्या या लाईव्हचा व्हिडीओ चांगलाच व्हायरल झाला.

Tags

follow us