Jab We Met 2: ब्रेकअपनंतर करिना अन् शाहिद पुन्हा एकत्र?, अभिनेता म्हणाला..

Jab We Met 2: शाहिद कपूरचा (Shahid Kapoor) बॉलीवूड प्रवेश झाल्यानंतर काही काळातच तो तरुणाईच्या गळ्यातील ताईत झाला होता. (Social media) त्याची ‘चॉकलेट बॉय’ ही प्रतिमा आजपर्यंत अधिक लोकप्रिय राहिली आहे. तसेच शाहिद आणि करिना कपूरचा सुपरहिट सिनेमा ‘जब वी मेट’ (Jab We Met ) आठवतो का? हाच सिनेमा यामुळे करिना कपूरला (Kareena Kapoor) आज […]

Jab We Met 2

Jab We Met 2

Jab We Met 2: शाहिद कपूरचा (Shahid Kapoor) बॉलीवूड प्रवेश झाल्यानंतर काही काळातच तो तरुणाईच्या गळ्यातील ताईत झाला होता. (Social media) त्याची ‘चॉकलेट बॉय’ ही प्रतिमा आजपर्यंत अधिक लोकप्रिय राहिली आहे. तसेच शाहिद आणि करिना कपूरचा सुपरहिट सिनेमा ‘जब वी मेट’ (Jab We Met ) आठवतो का? हाच सिनेमा यामुळे करिना कपूरला (Kareena Kapoor) आज देखील चाहते गीत म्हणून जास्त ओळखत असल्याचे बघायला मिळत असते.


२००७ मध्ये प्रदर्शित झालेला, हा रोमँटिक-कॉमेडी सिनेमा खूप हिट ठरला होता. चाहते अनेकवेळा सिनेमाच्या सिक्वेलची वाट बघत होते. तसेच या सिनेमाशी संबंधित नवीन माहिती देखील समोर आली आहे. मिळालेल्या माहितीनुसार ‘जब वी मेट’चा सिक्वेल बनवण्यात येणार आहे. अष्टविनायकचे मालक राज मेहता या सिनेमाची निर्मिती गंधार फिल्म्स बॅनरखाली करणार असल्याची चर्चा सध्या सुरु आहे.

https://www.youtube.com/watch?v=6T2Jqhk8vEI

गंधार ग्रुपने २०११ मध्ये गंधार फिल्म्स अँड स्टुडिओ प्रायव्हेट लिमिटेडची स्थापना करून मनोरंजन क्षेत्रामध्ये एंट्री केल्याचे बघायला मिळाले. या सिनेमाच्या पहिल्या भागाचे दिग्दर्शन करणारे दिग्दर्शक इम्तियाज अली ‘जब वी मेट’च्या सिक्वेलचे दिग्दर्शन करणार असल्याची माहिती मिळाली आहे. परंतु  ‘जब वी मेट २’ विषयी सिनेमाच्या निर्मात्यांनी कोणती देखील अधिकृत घोषणा करण्यात आली नाही. आता करीना कपूर खान आणि शाहिद कपूर या सिनेमासाठी पुन्हा एकदा एकत्र येऊन ‘गीत’ आणि ‘आदित्य’ या भूमिकेमध्ये बघायला मिळणार का, अशी चर्चा रंगत आहे.

Aparshakti Khuranaच्या नव्या गाण्याची खास पोस्ट; म्हणाला, ‘रिलीज करण्यापूर्वी…’

तसेच ‘जब वी मेट’ गेल्या काही दिवसापासून सिनेमागृहांमध्ये पुन्हा एकदा प्रदर्शित झाला होता. परंतु त्या दरम्यान शाहिद कपूरला या आयकॉनिक सिनेमाच्या सिक्वेलमध्ये भूमिका साकारायला आवडणार का? असा प्रश्न सध्या त्याला विचारण्यात आला आहे. यावर उत्तर देत असताना शाहिद म्हणाला आहे की, हे स्क्रिप्टवर अवलंबून असते. शाहिदने त्याच्या जब वी मेट सह-अभिनेत्री करीनाचे कौतुक केले आणि तिच्यासोबत ती भूमिका कोणीही साकारू शकत नसल्याचे त्याने यावेळी म्हणाला आहे.

Exit mobile version