Download App

Jacqueline Fernandez: जॅकलिन फर्नांडिसची कोर्टात धाव; 200 कोटींच्या प्रकरणात दिलासा मिळणार?

Jacqueline Fernandez Case: बॉलिवूड अभिनेत्री जॅकलिन फर्नांडिस (Jacqueline Fernandez ) ही फसवणूक करणारा सुकेश चंद्रशेखरशी संबंधित 200 कोटी रुपयांच्या मनी लाँड्रिंग प्रकरणामुळे बऱ्याच दिवसांपासून चर्चेत आहे. ईडीने त्याच्याविरुद्ध ईसीआयआर आणि पुरवणी आरोपपत्र दाखल केले आहे. आता या प्रकरणी अभिनेत्रीने दिल्ली उच्च न्यायालयात (Delhi HC) याचिका दाखल केली आहे. यामध्ये तिने दावा केला आहे की, आपल्याला या मनी लाँड्रिंग प्रकरणाची (Money laundering case) माहिती नाही.

सुकेशवर फसवणुकीचा आरोप: जॅकलिनने दाखल केलेल्या याचिकेत अभिनेत्रीने म्हटले आहे की, तिने पीएमएलए 2002 अंतर्गत मनी लाँड्रिंगशी संबंधित कोणताही गुन्हा केलेला नाही किंवा ती कोणत्याही प्रकारच्या गुन्ह्यात सामील नव्हती. याचिकेत असेही म्हटले आहे की, रॅनबॅक्सीचे माजी मालक शिविंदर सिंग यांची पत्नी अदिती सिंग यांनी केलेल्या तक्रारीत जॅकलिन फर्नांडिसने मुख्य आरोपी सुकेश चंद्रशेखरला कथित गुन्हा करण्यासाठी कोणत्याही प्रकारे प्रवृत्त केल्याचा आरोप नाही.

जॅकलिनच्या याचिकेत असेही म्हटले आहे की, ईडीने सादर केलेल्या पुराव्यांवरून अभिनेत्री निर्दोष असल्याचे सिद्ध होते आणि सुकेशने तिला बळी बनवले आहे. सुकेशने मोठा उद्योगपती असल्याचे तिला यामध्ये अडकावल्याचे सांगितले आहे.


काय प्रकरण आहे? सुकेश चंद्रशेखरवर 200 कोटी रुपयांची उधळपट्टी केल्याचा आरोप असून तो सध्या दिल्लीच्या तिहार तुरुंगात बंद आहे. जून 2020 ते मे 2021 पर्यंत सुकेशने तिच्याकडून 200 कोटी रुपये उकळल्याचा आरोप आदिती सिंहने केला आहे. या प्रकरणात जॅकलिन फर्नांडिसचे नाव जोडले गेले आहे कारण तिने जॅकलिनला अनेक कोटींच्या भेटवस्तू दिल्या होत्या. दोघेही रिलेशनशिपमध्ये होते आणि सुकेश जॅकलीनला करोडोंच्या भेटवस्तू दिल्याचे आरोप लावण्यात आले आहे.

Urfi Javed इंस्टाग्राम बंद करणार; पोस्ट करत स्वतःच सांगितलं कारण…

जॅकलिन सुकेश रिलेशनशिप मध्ये होते? सुकेशने अभिनेत्रीला करोडो रुपयांचे दागिने, चार पर्शियन मांजरी आणि एक घोडा (57 कोटी रुपये) भेट दिला आहे. इतकेच नाही तर सुकेशने जॅकलिनच्या कुटुंबाला अनेक महागड्या भेटवस्तूही दिल्या आहेत, ज्यात दोन कारचाही समावेश आहे. एका कारची किंमत 1.89 कोटी रुपये आणि दुसऱ्याची 1.25 कोटी रुपये आहे.

Tags

follow us