Download App

Jailer Actor Passed Away : अभिनेते जी मारीमूथू यांचं निधन; डबिंग स्टुडिओमध्ये घेतला अखेरचा श्वास

  • Written By: Last Updated:

Jailer Actor Passed Away : प्रसिद्ध दक्षिणात्य अभिनेते जी मारीमूथू यांचं ह्रदयविकाराच्या झटक्याने निधन झालं आहे. त्यांनी नुकतचं अभिनेते रजनीकांत यांच्या जेलर चित्रपटमध्ये भूमिका साकरली होती. त्यांनी डबिंग स्टुडिओमध्ये अखेरचा श्वास घेतला. ते 58 वर्षांचे होते. त्यांच्या निधनाने तमिळसह भारतीय चित्रपटसृष्टीवर शोककळा पसरली आहे.

विखेंवर भंडारा उधळल्यानंतर लाथाबुक्यांखाली तुडवलेला शेखर बंगाळे कोण?

डबिंग स्टुडिओमध्ये घेतला अखेरचा श्वास…

जी मारीमूथू हे ‘इथर्नीचल’ या टीव्ही शोचे डबिंग करत होते. त्यावेळी ते अचानक कोसळले. त्यांना तातडीने रूग्णालयात दाखल करण्यात आले. त्यावेळी त्यांना ह्रदयविकाराचा झटका आला होता. हे निष्पन्न झाले. तर रूग्णालयात डॉक्टरांनी त्यांना मृत घोषित केले. त्यांच्या जेलर आणि रेड सॅंडलवूड या चित्रपटातील त्यांच्या अभिनयाचं प्रचंड कौतुक झालं.

रश्मी शुक्ला यांना मोठा दिलासा, फोन टॅपिंग प्रकरणातील दोन्ही गुन्हे हायकोर्टाकडून रद्द

जी मारीमूथू यांच्या पश्चात त्यांना पत्नी आणि दोन मुलं आहेत. त्यांनी मणिरत्नम, वसंत, सीमा आणि एसजे सूर्या यांच्यासोबत त्यांनी सहाय्यक दिग्दर्शक म्हणून काम केले आहे. त्यांच्या निधनाने तमिळसह भारतीय चित्रपटसृष्टीवर शोककळा पसरली आहे. सिनेसृष्टीतून त्यांना श्रद्धांजली वाहण्यात येत आहे.

https://youtu.be/PsFTp2Q_JOo?si=6gc5_QDHfxnLt5Q0

Tags

follow us