Download App

Janhvi Kapoor: जान्हवी कपूरच्या चित्रपटात दिसणार ‘हा’ मराठी अभिनेता, झलक आली समोर

  • Written By: Last Updated:

Janhvi Kapoor: ‘धडक’ (Dhadak) हा मराठी सुपरहिट चित्रपट ‘सैराट’चा हिंदी रिमेक आहे. मराठी चित्रपट असलेल्या ‘सैराट’ला प्रेक्षकांनी डोक्यावर घेतलं होतं, पण ‘धडक’ला मिळालेला रिस्पॉन्स तसा थंडच होता. विशेष म्हणजे लोकांनी जान्हवीची (Janhvi Kapoor) तुलना तिच्या आईशी केली. तिचा लूक असो, तिचे डायलॉग डिलिव्हर करण्याची स्टाईल आणि अभिनय या सगळ्याचं गोष्टींची तुलना झाली.


जान्हवी कपूरने आई श्रीदेवी यांच्या पावलांवर पाऊल ठेवत अभिनय क्षेत्रामध्ये पदार्पण केले आहे. अनेक बॉलिवूड (Bollywood) सिनेमामध्ये भूमिका साकारत जान्हवीने अल्पवधीत काळात प्रेक्षकांची मने जिंकली आहेत. स्टार किड्सच्या यादीमध्ये देखील जान्हवीचे नाव आज टॉपला घेतले जात आहे. आता नुकतंच जान्हवीच्या या नव्या सिनेमाची घोषणा करण्यात आली आहे.

यामध्ये एक मराठी अभिनेता देखील झळकणार आहे. नुकतंच त्याची एक आता झलक समोर आली. जान्हवी कपूरच्या आगामी सिनेमाचे नाव ‘उलझ’ असे आहे. या सिनेमात ती भारतीय परराष्ट्र सेवेतील अधिकाऱ्याची भूमिका साकारणार आहे. हा सिनेमा देशभक्तीवर आधारित असणार आहे. पुढील महिन्याच्या अखेरीस या सिनेमाचे शूटींग सुरु होणार आहे.

राखी सावंतच्या भावाला मुंबई पोलिसांकडून अटक, 22 मे पर्यंत कोठडीत रवानगी

या सिनेमात जान्हवीसोबत गुलशन देवैया आणि रोशन मॅथ्यू मुख्य भूमिकेमध्ये झळकणार आहे. शिवाय या सिनेमात राजेश तैलंग, मीयांग चांग, ​​सचिन खेडेकर, राजेंद्र गुप्ता आणि जितेंद्र जोशी हे देखील महत्त्वाची भूमिका साकारणार आहे. राष्ट्रीय पुरस्कार विजेते सुधांशू सारिया या सिनेमाचे दिग्दर्शन करत आहेत.

या सिनेमाशिवाय जान्हवी कपूर ‘मिस्टर अँड मिसेस माही’ आणि ‘बवाल’ या सिनेमामध्येही दिसणार आहे. आणि ती ज्युनियर एनटीआरसोबत ‘एनटीआर 30’ हा सिनेमाही करत आहे.

Tags

follow us