Download App

Janhvi Kapoor Dance: ‘हम आये हैं’ गाण्यावर टायगरसोबत जान्हवी थिरकली, Video Viral

Dance Video Viral : टायगर श्रॉफचा (Tiger Shroff) गणपत हा चित्रपट (Ganpat Movie) आज थिएटरमध्ये प्रदर्शित करण्यात आला. याअगोदर अभिनेता चित्रपटाचे जोरदार प्रमोशन करताना दिसला होता. टायगरने नुकताच त्याच्या सोशल मीडियावर (Social media) एक व्हिडिओ शेअर केला आहे, ज्यामध्ये तो जान्हवी कपूरसोबत (Janhvi Kapoor) ‘गणपत’ चित्रपटातील गाण्यावर दोघेही थिरकताना दिसत आहे. सध्या तिचा हा व्हिडिओ प्रचंड व्हायरल होत आहे.


व्हिडिओमध्ये जान्हवी आणि टायगर ‘हम आये हैं’ या गाण्यावर डान्स करताना दिसले. दोघांनी गाण्याची हुकटेप केली. लुकबद्दल बोलायचे झाले तर जान्हवी व्हाइट क्रॉप टॉप आणि ब्लू डेनिम जीन्समध्ये दिसत आहे. तर टायगर ब्लॅक व्हेस्ट आणि ब्लॅक जीन्समध्ये डान्स करताना दिसत आहे. व्हिडिओ शेअर करताना टायगरने कॅप्शनमध्ये लिहिले आहे की, ही स्टनर मला दाखवत आहे की हे कसे केले जाते. कुणी विचारलं तर सांगा की जान्हवी कपूर आणि मी आलो आहोत. सोशल मीडियावर टायगरचा हा व्हिडीओ चाहत्यांना चांगलाच आवडला आहे.

या सिनेमात टायगर फाईटर म्हणून रिंगमध्ये बॉक्सिंग करत असल्याचे देखील बघायला मिळत आहे. तर दुसरीकडे परम सुंदरी क्रिती सेनॉन सुद्धा हटक्या अवतारात बघायला मिळत आहे. आणि चाहत्यांचे लाडके अमिताभ बच्चन देखील एका अनोख्या लूकमध्ये बघायला मिळत आहेत. एकूणच अ‍ॅक्शनचा जोरदार तडका असलेल्या गणपतचा टीझर चांगलाच धुमाकूळ घालत आहे. तसेच ‘गणपत’ या सिनेमात टायगर श्रॉफ, चाहत्यांची लाडकी परम सुंदरी क्रिती सनॉन हे मुख्य भूमिका साकारत आहेत.

India vs Bangladesh: वर्ल्डकपमध्ये विराटचं पहिलं शतक; नवऱ्याचं तोंडभरून कौतुक करत अनुष्काची पोस्ट

गणपत, ए हिरो इज बॉर्न आज हिंदी, तेलगू, तमिळ, मल्याळम आणि तेलगू भाषांमध्ये प्रदर्शित करण्यात आला आहे. कृती सेनन आणि टायगर श्रॉफ हीरोपंती या त्यांच्या पहिल्या चित्रपटानंतर जवळपास 9 वर्षांनी पुन्हा एकत्र पडद्यावर दिसणार आहेत. या चित्रपटाचे दिग्दर्शन विकास बहल यांनी केले आहे तर पूजा एंटरटेनमेंटची निर्मिती आहे. या चित्रपटात टायगर आणि कृती सेनन व्यतिरिक्त अमिताभ बच्चन मुख्य भूमिकेत आहेत. ‘गणपत’मध्ये कृती पहिल्यांदाच जबरदस्त अॅक्शन करताना दिसणार आहे.

Tags

follow us

वेब स्टोरीज