Jailer: ऐसी दिवानगी देखी नहीं; रजनीकांतच्या ‘जेलर’ साठी पार केला 6 हजार किमीचा टप्पा!

Rajinikanth Jailer Movie: दाक्षिणात्य सुपरस्टार अभिनेता रजनीकांत (Rajinikanth) म्हणजेच चाहत्यांचा लाडका थलायवा कायम चर्चेत असलयाचे पाहायला मिळतो. तसेच त्याचा चाहता वर्ग देखील सातासमुद्रापार असल्याचे सध्या बघायला मिळत आहे. (Rajinikanth Jailer Movie) नुकताच थलायवाचा ‘जेलर’ (Jailer) हा सिनेमा प्रदर्शित करण्यात आला आहे. VIDEO | A Japanese couple has travelled from Osaka to Chennai, Tamil Nadu to […]

Jailer

Jailer

Rajinikanth Jailer Movie: दाक्षिणात्य सुपरस्टार अभिनेता रजनीकांत (Rajinikanth) म्हणजेच चाहत्यांचा लाडका थलायवा कायम चर्चेत असलयाचे पाहायला मिळतो. तसेच त्याचा चाहता वर्ग देखील सातासमुद्रापार असल्याचे सध्या बघायला मिळत आहे. (Rajinikanth Jailer Movie) नुकताच थलायवाचा ‘जेलर’ (Jailer) हा सिनेमा प्रदर्शित करण्यात आला आहे.

हा सिनेमा बघण्यासाठी चाहत्यांची सिनेमागृहाबाहेर मोठ्या प्रमाणात गर्दी केल्याचे पाहायला मिळत आहे. अशातच, जपानमध्ये राहणारे एक जोडपं (Japan Couple) चेन्नईला रजनीकांतचा चित्रपट पाहण्यासाठी आले आहे. ‘जेलर’ चित्रपटाच्या रिलीजच्या दिवशी म्हणजे आज बंगळूरू आणि चेन्नईसह अनेक ठिकाणी सुट्टी जाहीर करण्यात आली आहे. अशातच एक जापानी जोडपे ओसारावरुन चेन्नईला आले आहे.

म्हणजेच 6 हजार किमीचा टप्पा पार करून थलायवाचा ‘जेलर’ पाहण्यासाठी आले आहेत. तसेच त्यांनी थलायवाचा फोटो असलेले टी-शर्ट घातल्याचे देखील बघायला मिळत आहे. खरे तर सर्वात आकर्षित करणारी गोष्ट म्हणजे या जोडप्याने पीटीआयशी बोलत असताना तमिळ भाषेत संवाद केल्याचे दिसत आहे. थलायवाच्या जापानी चाहत्याने सांगितले आहे की, ते चेन्नईमध्ये जेलर हा सिनेमा बघण्यासाठी आले आहेत. त्यांना या सिनेमातील गाणी खूपच आवडले आहेत. मुथू सिनेमा बघितल्यानंतर हे जोडपे थलायवाचे चाहते झाले होते.

Ishan Khattar लाईव्हचा कॅमेरा बंद करायचा विसरला अन् झालं असं काही…

आता ते जेलर सिनेमा बघण्यासाठी थेट चेन्नई गाठले आहेत. तसेच समोर आलेल्या माहितीनुसार, जेलर सिनेमाने पहिल्या दिवशी ५० कोटीहून मोठी कमाई केली आहे ‘जेलर’ या सिनेमात रजनीकांत मुथुवेल पांडियन, एका सामान्य कुटुंबाभिमुख पुरुषाची भूमिका साकारत असल्याचे बघायला मिळाले आहे. तसेच त्यांच्यावर संकट येऊ लागतात, त्यावेळेस ते त्यांचा सामना कोणत्या पद्धतीने करतात हे दाखवण्याचा प्रयत्न करण्यात आला आहे.

Exit mobile version