Jawan Box Collection: किंग खानचा बॉक्स ऑफिसवर जलवा; ७ दिवसात केली एवढी कमाई

Box Office Collection: बॉलीवूडचा अभिनेता किंग खान म्हणजेच चाहत्यांचा शाहरुख खानचा (Shah Rukh Khan) ‘जवान’ (Jawan) हा सिनेमा 7 सप्टेंबर दिवशी थिएटरमध्ये प्रदर्शित करण्यात आला आहे. हा सिनेमा  सध्या बॉक्स ऑफिसवर जोरदार धुमाकूळ घालत आहे. (Social media) या अ‍ॅक्शन थ्रिलर सिनेमान पहिल्याच दिवशी बॉक्स ऑफिसवर इतिहास रचला. जवान हा सिनेमा भारतीय सिनेमाच्या इतिहासात पहिल्या दिवशी […]

Jawan New Song Out

Jawan New Song Out

Box Office Collection: बॉलीवूडचा अभिनेता किंग खान म्हणजेच चाहत्यांचा शाहरुख खानचा (Shah Rukh Khan) ‘जवान’ (Jawan) हा सिनेमा 7 सप्टेंबर दिवशी थिएटरमध्ये प्रदर्शित करण्यात आला आहे. हा सिनेमा  सध्या बॉक्स ऑफिसवर जोरदार धुमाकूळ घालत आहे. (Social media) या अ‍ॅक्शन थ्रिलर सिनेमान पहिल्याच दिवशी बॉक्स ऑफिसवर इतिहास रचला. जवान हा सिनेमा भारतीय सिनेमाच्या इतिहासात पहिल्या दिवशी सर्वाधिक कमाई करणारा सिनेमा ठरला आहे.


जवानाने पहिल्या दिवशी देशात जवळपास ७५ कोटी रुपयांचा गल्ला कमावला आहे, आणि जगभरात १२५ कोटी रुपयांची कमाई केल्याचे सांगितले जात आहे. जवान या सिनेमाने प्रदर्शितच्या तिसऱ्या दिवशी ८१ कोटींचा गल्ला कमावला आहे. परंतु रविवारनंतर सिनेमाच्या कमाईत घट होत असल्याचे बघायला मिळत होते. ‘जवान’ने प्रदर्शितच्या ७ व्या दिवशी नेमकी किती कोटींची कमाई केली आहे, चला तर मग पाहूया…

वीकडेला जवान सिनेमाच्या कलेक्शनमध्ये चांगलीच घसरण झाली. ‘जवान’ सिनेमान रविवारी ८०.१ कोटींचा गल्ला कमवून इतिहास रचला आहे. तसेच सोमवारी सिनेमाच्या कलेक्शनमध्ये मोठी घसरण झाली आहे. सोमवारी या सिनेमाने ३२.९२ कोटी रुपयांचा गल्ला कमावला आहे. तसेच मंगळवारी २६ कोटी रुपयांची कमाई या सिनेमानं केली होती. आता रिलीजच्या ७ व्या दिवशी सिनेमान २३ कोटींचा गल्ला कमावला आहे.

‘जवान’ सिनेमाची ७ दिवसांची एकूण कमाई आता ३६७.५८ कोटींवर येऊन पोहोचला आहे. लवकरच हा सिनेमा ४०० कोटींच्या क्लबमध्ये सामील होण्याची शक्यता वर्तवली जात आहे. ‘जवान’ हा बॉलिवूडमधील सर्वाधिक ओपनिंग मिळवणारा सिनेमा ठरला आहे.

‘जवान’ ऑनलाइन लीक; प्रॉडक्शन हाऊसने उचलले मोठे पाऊल

याअगोदर हा रेकॉर्ड किंग खानच्या ‘पठाण’ आणि सनी पाजीच्या ‘गदर २’च्या नावे होता. या दोघांना मागे टाकत ‘जवान’ने चांगलीच बाजी मारली आहे.  या सिनेमात किंग खान, नयनतारा आणि विजय सेतुपती यांच्या मुख्य भूमिका आहेत. तसेच यामध्ये प्रियामणी, सान्या मल्होत्रा, रिद्धी डोग्रा, आलिया, गिरीजा ओक यांच्या महत्त्वाच्या भूमिका बघायला मिळत आहेत. याशिवाय दीपिका पदुकोणचा कॅमिओदेखील आहे.

Exit mobile version