Download App

Atlee: अल्लू अर्जुनसोबत पुढील चित्रपटासाठी दिग्दर्शक अ‍ॅटलीला मिळणार ‘इतके’ मानधन

Jawan Director Atlee Demand: शाहरुख खानसोबत (Shah Rukh Khan) ‘जवान’ हा चित्रपट केल्यानंतर दिग्दर्शक ॲटली (Atlee) आता खूपच भाव खाऊन जात आहेत. म्हणजे त्यानं आता दिग्दर्शक म्हणून स्वतःच्या प्रोजेक्ट्सचे मानधन वाढवले ​​आहे. जवानच्या बंपर यशानंतर ऍटली पुष्पा फेम अभिनेता अल्लू अर्जुनसोबत (Allu Arjun) चित्रपट बनवण्याच्या तयारीत आहे. चित्रपट जवळपास निश्चित झाला आहे. आता कोणाला किती पैसे मिळणार याची चर्चा सुरू आहे.

जवाना सिनेमाने तब्बल 1050 कोटी रुपयांची कमाई केली होती. या चित्रपटातील ॲटली यांच्या दिग्दर्शनाचे खूप कौतुक झाले होते. त्याने शाहरुख खानला ज्या पद्धतीने सादर केले ते पाहून इंडस्ट्रीत ॲटलीची मागणी वाढली. आता ऍटलीने फी वाढवली आहे. ॲटलीने फी व्यतिरिक्त निर्मात्यांकडून चित्रपटाच्या नफ्यात वाटा मागितला आहे. ॲटलीची टीम याबाबत अल्लू अरविंद यांच्याशी बोलत आहे.

ॲटली या चित्रपटासाठी किती फी आकारणार आहेत, याबाबत सध्या कोणतीही माहिती समोर आलेली नाही. जवान दिग्दर्शित करण्यासाठी ॲटली यांनी सुमारे 30 कोटी रुपये आकारले असल्याची चर्चा होती. अशा परिस्थितीत अल्लू अर्जुनच्या चित्रपटासाठी ही रक्कम यापेक्षा जास्त असू शकते. तेलुगू सिनेमाने आपल्या स्रोताचा हवाला देत सांगितले आहे की, ॲटली या चित्रपटात सन पिक्चर्सचा निर्मिती भागीदार म्हणून सहभाग घेत आहेत.

‘लाईट्स, कॅमेरा…’; सनी लिओनने होस्ट केलेला ‘स्प्लिट्सविला एक्स 5’वर होणार रिलीज

अल्लू अर्जुन पुष्पा 2 मध्ये व्यस्त

अल्लू अर्जुन सध्या सुकुमार दिग्दर्शित पुष्पा 2 मध्ये व्यस्त आहे. ‘पुष्पा 2’ हा 2021 मध्ये प्रदर्शित झालेला पुष्पाचा दुसरा भाग आहे. या वर्षी 15 ऑगस्टला निर्माते हा चित्रपट प्रदर्शित करणार आहेत. ऍटली आणि अल्लू अरविंद यांच्यात सर्वकाही सामान्य राहिल्यास, पुष्पा 2 नंतर या चित्रपटावर काम सुरू होण्याची अपेक्षा आहे.

follow us