Kangana Ranaut: ‘जवान’चं कंगनानं केलं तोंडभरुन कौतुक; पोस्ट शेअर करत म्हणाली, ‘शाहरुख हा…’

Kangana Ranaut: अभिनेता किंग खानचा (Shah Rukh Khan) ‘जवान’ (Jawan) हा सिनेमा प्रदर्शित झाला आहे. या सिनेमामधील डायलॉग्स, अॅक्शन सीन्स या सगळ्याच गोष्टींना चाहत्यांची मोठी पसंती मिळत आहे. अनेक जण किंग खानच्या या सिनेमाचं सोशल मीडियावर पोस्ट शेअर करुन तोंडभरून कौतुक करत असल्याचे बघायला मिळत आहे. नुकतीच अभिनेत्री कंगना रनौतनं (Kangana Ranaut) एक खास पोस्ट […]

Kangana Ranaut

Kangana Ranaut

Kangana Ranaut: अभिनेता किंग खानचा (Shah Rukh Khan) ‘जवान’ (Jawan) हा सिनेमा प्रदर्शित झाला आहे. या सिनेमामधील डायलॉग्स, अॅक्शन सीन्स या सगळ्याच गोष्टींना चाहत्यांची मोठी पसंती मिळत आहे. अनेक जण किंग खानच्या या सिनेमाचं सोशल मीडियावर पोस्ट शेअर करुन तोंडभरून कौतुक करत असल्याचे बघायला मिळत आहे. नुकतीच अभिनेत्री कंगना रनौतनं (Kangana Ranaut) एक खास पोस्ट शेअर करुन किंग खानच्या जवान या सिनेमाचं तोंडभरून कौतुक केलं आहे.

Kangana Ranaut Post

कंगनाची पोस्ट

कंगनानं सोशल मीडियावरील पोस्टमध्ये सांगितले आहे की, ‘नव्वदच्या दशकातील लव्हर बॉय ते वयाच्या (जवळपास) 60 व्या वर्षी भारतीय मास सुपरहिरो म्हणून उदयास आलेल्या हिरोचा एक दशकाचा दीर्घ संघर्ष. तो त्याच्या खऱ्या जीवनातही सुपर हिरोपेक्षा कमी नाही. मला तो काळ आठवतो जेव्हा लोकांनी त्याच्या निवडीची जोरदार खिल्ली उडवली होती. मात्र त्याचा संघर्ष त्या सर्व कलाकारांसाठी एक प्रेरणादायी आहे, जे दीर्घ कारकीर्दीचा आनंद घेतला आहे. परंतु त्यांना पुनर्स्थापित होणं आवश्यक आहे.’


‘किंग खान हा सिनेमाचा देव आहे, ज्याला ज्याची देशाला खूप गरज आहे. फक्त मिठी मारण्यासाठी किंवा डिंपलसाठी त्याची गरज नाही तर गंभीर जगासाठी देखील त्याची गरज आहे. मेहनत आणि नम्रता याबद्दल किंग खानचं कौतुक.’ असंही तिनं या पोस्टमध्ये लिहल्याचे दिसत आहे. कंगनानं तिच्या या पोस्टमध्ये ‘हॅशटॅग जवान, सिनेमाच्या संपूर्ण टीमचे अभिनंदन’ असंही लिहिलं आहे.

किंग खानच्या जवाननं प्रदर्शित झाल्यावर पहिल्या दिवशी कोट्यवधींचा गल्ला कमावला आहे. ‘जवान’ या सिनेमात किंग खानसोबत विजय सेतुपती, नयनतारा, दीपिका पादुकोण, संजय दत्त, सान्या मल्होत्रा, प्रियामणी, रिद्धि डोगरा, गिरिजा ओक या कलाकारांनी मुख्य भूमिका साकारली आहे.आता किंग खानच्या आगामी सिनेमाची चाहते मोठ्या उत्सुकतेने वाट पाहत असतात. जवाननंतर आता किंग खानचा डंकी हा सिनेमा चाहत्यांच्या भेटीला येणार आहे.

Anti Heroes: शाहरुख खान ते राजकुमार राव रुपेरी पडद्यावर ठरले ‘पॉवर अँटी हिरोज’

आपल्या सडेतोड आणि बिनधास्त स्वभावासाठी ओळखली जाणारी अभिनेत्री म्हणजे कंगना रणौत. ‘बॉलिवूडची क्वीन’ म्हणून ती सतत चर्चेत असते. लवकरच चंद्रमुखी 2 हा सिनेमा लवकरच चाहत्यांचा भेटीला येणार आहे. गेल्या काही दिवसापासून या सिनेमाचा ट्रेलर प्रदर्शित झाला. तसेच तिच्या इमर्जन्सी आणि तेजस या आगामी सिनेमाची देखील चाहत्यांना मोठ्या उत्सुकतेने वाट बघत आहेत.

Exit mobile version