Jawan मधील ‘नॉट रमैया वस्तावैया’ गाणं आलं चाहत्यांच्या भेटीला; किंग खान अन् नयनतारा यांचा हटके डान्स

Jawan New Song Out: बॉलिवूडचा बादशाह अशी ओळख असणाऱ्या किंग खानच्या (Shah Rukh khan) जवान या सिनेमाची चाहते मोठ्या उत्सुकतेने वाट पाहात आहेत. या सिनेमाचा प्री व्ह्यू गेल्या काही दिवसाअगोदर प्रदर्शित झाला. तसेच या सिनेमामधील जिंदा बंदा आणि चलेया ही गाणी देखील चाहत्यांच्या भेटीला आली. आता या सिनेमाच्या ट्रेलरची चाहते उत्सुकतेने वाट बघत आहेत. जवान […]

Jawan New Song Out

Jawan New Song Out

Jawan New Song Out: बॉलिवूडचा बादशाह अशी ओळख असणाऱ्या किंग खानच्या (Shah Rukh khan) जवान या सिनेमाची चाहते मोठ्या उत्सुकतेने वाट पाहात आहेत. या सिनेमाचा प्री व्ह्यू गेल्या काही दिवसाअगोदर प्रदर्शित झाला. तसेच या सिनेमामधील जिंदा बंदा आणि चलेया ही गाणी देखील चाहत्यांच्या भेटीला आली. आता या सिनेमाच्या ट्रेलरची चाहते उत्सुकतेने वाट बघत आहेत. जवान सिनेमाच्या ट्रेलर अगोदर या सिनेमामधील ‘नॉट रमैया वस्तावैया’ हे गाणं प्रदर्शित करण्यात आलं आहे. या गाण्यात किंग खान आणि अभिनेत्री नयनतारा (Nayanthara) यांचा जबरदस्त डान्स बघायला मिळत आहे.

अनिरुद्ध रविचंदर, विशाल ददलानी आणि शिल्पा राव यांनी ‘नॉट रमैया वस्तावैया’ हे गाणं गायलं आहे. तर अनिरुद्ध रविचंदर यांनी हे गाणं संगीतबद्ध केले आहे. कुमार हे या गाण्याचे गीतकार आहेत. ‘नॉट रमैया वस्तावैया’ या गाण्यात किंग खान आणि नयनतारा यांचा रोमँटिक अंदाज देखील दिसत आहे.

गेल्या काही दिवसाअगोदर जवान या सिनेमामधील ‘जिंदा बंदा’ हे गाणं चाहत्यांच्या भेटीला आला. ‘जिंदा बंदा’ या गाण्यात किंग खानसोबत सान्या मल्होत्रा, प्रियामणी, गिरिजा ओक, संजीता भट्टाचार्य या अभिनेत्री देखील धमाल डान्स करताना दिसले. तर जवान सिनेमामधील ‘चलेया’ या गाण्यात किंग खान आणि नयनतारा यांची केमिस्ट्री चाहत्यांना बघायला मिळाली आहे. ‘जिंदा बंदा आणि चलेया’ या दोन्ही गाण्यांना चाहत्यांची मोठी पसंती मिळाली आहे.

‘Jar Tar Chi Gosht’ नाटकाचा महाराष्ट्रात धुमाकूळ; आतापर्यंतचे सगळे प्रयोग ‘हाऊसफुल्ल’

‘जवान’ या सिनेमाचा ट्रेलर ३१ ऑगस्ट २०२३ दिवशी प्रदर्शित करण्यात येणार आहे. ‘जवान’ सिनेमाचा ट्रेलर बुर्ज खलिफावर झळकणार असल्याने चाहत्यांची उत्सुकता शिंगेला पोहचली आहे. जवान हा सिनेमा 7 सप्टेंबर दिवशी सिनेमागृहात प्रदर्शित होणार आहे. हा सिनेमा हिंदी, तामिळ आणि तेलुगू भाषेत प्रदर्शित केला जाणार आहे. या सिनेमाचं दिग्दर्शन अॅटलीनं केलं आहे. गेल्या काही दिवसापासून सेन्सॉर बोर्डानं जवान या सिनेमाला U/A प्रमाणपत्र देण्यात आले आहे.

जवान या सिनेमात किंग खान आणि नयनतारासोबतच विजय सेतुपती, सुनील ग्रोवर प्रियमणी, सान्या मल्होत्रा,प्रियामणी, गिरिजा ओक, संजीता भट्टाचार्य आणि दीपिका पादुकोण हे कलाकार देखील मुख्य भूमिका साकारणार आहेत. किंग खानचा पठाण हा सिनेमा चाहत्यांच्या भेटीला आला होता. या सिनेमाने बॉक्स ऑफिसवर जोरदार धुमाकूळ घातला आहे. आता किंग खानचा जवान हा सिनेमा प्रदर्शित होणार आहे. तसेच त्याचा डंकी हा सिनेमा देखील चाहत्यांच्या भेटीला येणार आहे.

Exit mobile version