Download App

Jawan : बुर्ज खलिफावर झळकला किंग खानचा जलवा! ‘जवान’च्या ट्रेलर रिलीजला तुफान गर्दी

Jawan Trailer Burj Khalifa Dubai: देशात धुमाकूळ घातल्यानंतर ‘बॉलिवूड (Bollywood) किंग खानच्या (Shah Rukh Khan) ‘जवान’चा हटके ट्रेलर दुबईच्या बुर्ज खलिफा (Burj Khalifa Dubai) येथे प्रदर्शित करण्यात आला आहे. (Jawan Trailer) दुबईमध्ये किंग खानचे लाखो चाहते त्याची एक झलक बघण्यासाठी मोठ्या आतुरतेने वाट बघत असल्याचे दिसत होते. ‘जवान’च्या ट्रेलर प्रदर्षितच्या इव्हेंटमध्ये २० हजारापेक्षा जास्त चाहते उपस्थित होते.

https://twitter.com/SRKUniverse/status/1697304113011167406?s=20

बुर्ज खलिफावर किंग खानला बघून चाहते वेडे झाले होते. या कार्यक्रमाच्या ट्रेलरशिवाय किंग खानच्या ‘जवान’ मधील ‘चलेया’ या गाण्याचे अरबी व्हर्जनही देखील प्रदर्शित करण्यात आले आहे. तसेच चेन्नईतील प्री-रिलीज इव्हेंटनंतर किंग खानने तब्बल २० हजारापेक्षा जास्त चाहत्यांसह बुर्ज खलिफा येथे ‘जवान’चा ट्रेलर प्रदर्शित करण्यात आला आहे. बुर्ज खलिफावरील जवानचा ट्रेलर बघून चाहत्यांच्या आनंदाला पारावारच उरला नाही.

‘जवान’चा हटकेबाज ट्रेलर बघून किंग खानचे हजारो चाहते मोठ्या प्रमाणात जल्लोष केला आहे. शिवाय सिनेमातील ‘चलेया’ या गाण्याचे अरेबिक व्हर्जनही देखील प्रदर्शित करण्यात आला आहे. यावेळी किंग खानने जवानच्या ‘चलेया’ या गाण्यावर जोरदार डान्स केला. किंग खान आणि नयनताराची अप्रतिम केमिस्ट्री बघून चाहत्यांनीही देखील ठेका धरला होता. या कार्यक्रमामध्ये खुद्द किंग खान डान्स करत असल्याचे बघायला मिळाले आहे. अॅक्शन आणि मनोरंजनाने भरलेल्या किंग खानच्या ‘जवान’बद्दल आता चाहत्यांची देखील उत्कंठा शिगेला पोहोचली आहे.

Jawan Trailer: जबरदस्त डायलॉग्स अन् अ‍ॅक्शन सीन्स; किंग खानचा धमाकेदार ‘जवान’चा ट्रेलर प्रदर्शित

‘जवान’च्या बहुप्रतिक्षित ट्रेलर प्रदर्शित होताच सर्वत्र जोरदार खळबळ उडवून दिला आहे. आता चाहते सिनेमाच्या प्रदर्शितची म्हणजेच ७ सप्टेंबरची मोठ्या आतुरतेने वाट बघत आहेत. किंग खानच्या ‘जवान’चे दिग्दर्शन अॅटली कुमार यांनी केले आहे. तर, तर संगीत दिग्दर्शक अनिरुद्ध रविचंदर आणि निर्माता भूषण कुमार आहेत. गौरी खान आणि गौरव वर्मा यांनी निर्मितीची धुरा सांभाळली आहे. या सिनेमात किंग खानसोबत नयनतारा, विजय सेतुपती, दीपिका पदुकोण, सान्या मल्होत्रा यांसारख्या अनेक अभिनेत्रींनी या सिनेमातून पदार्पण केले आहे. ‘जवान’ हा सिनेमा हिंदी, तमिळ आणि तेलुगू भाषांमध्ये देशभरातील सिनेमागृहांमध्ये प्रदर्शित होणार आहे.

Tags

follow us