Jawan Twitter Review: कसा आहे किंग खानचा ‘जवान’ सिनेमा? जाणून घ्या ट्विटर रिव्ह्यू

Jawan Twitter Review: आज ७ सप्टेंबर रोजी किंग खान (Shah Rukh Khan) म्हणजेच शाहरुखचा ‘जवान’ हा सिनेमा प्रदर्शित करण्यात आला आहे. या सिनेमाला चाहत्यांचा चांगला (Review) प्रतिसाद मिळत आहे. चला जाणून घेऊया प्रेक्षकांकडून जवान मूव्ही कसा आहे. देशभरातील चाहते या सिनेमाची आतुरतेने वाट बघत होते. (Advance Booking) या सिनेमाच्या अडवान्स बुकींगने एक अनोखा रेकॉर्ड केले […]

National Cinema Day

National Cinema Day

Jawan Twitter Review: आज ७ सप्टेंबर रोजी किंग खान (Shah Rukh Khan) म्हणजेच शाहरुखचा ‘जवान’ हा सिनेमा प्रदर्शित करण्यात आला आहे. या सिनेमाला चाहत्यांचा चांगला (Review) प्रतिसाद मिळत आहे. चला जाणून घेऊया प्रेक्षकांकडून जवान मूव्ही कसा आहे. देशभरातील चाहते या सिनेमाची आतुरतेने वाट बघत होते. (Advance Booking) या सिनेमाच्या अडवान्स बुकींगने एक अनोखा रेकॉर्ड केले आहेत.

https://twitter.com/AnwarAliUsmani1/status/1699611164165218675?s=20

https://twitter.com/BigggBoss17/status/1699611495762637223?s=20

बॉलीवूडचा किंग खान बहुप्रतिक्षीत ‘जवान’ चित्रपट सिनेमागृहांमध्ये आज (७ सप्टेंबर) प्रदर्शित झाला आहे. शाहरुखचे चाहते पहाटेपासूनच सिनेमा बघण्यासाठी थिएटर्सबाहेर मोठ्या प्रमाणात गर्दी करत आहेत. अनेक चाहते फर्स्ट डे फर्स्ट शो बघण्यासाठी मोठ्या प्रमाणात पोहोचले असून ते ‘जवान’बद्दल ट्विटरसह इतर सोशल मीडिया प्लॅटफॉर्मवर आपले रिव्ह्यू देत असल्याचे बघायला मिळत आहे.

https://twitter.com/SRKUniverse/status/1699610545916424333?s=20

ज्या लोकांनी सिनेमा पाहण्यास सुरुवात केली आहे. ते सोशल मीडियावर सिनेमाचं कौतुक करत असताना बघायला मिळत आहे. ‘जवान’मध्ये किंग खानसोबत नयनतारा, सान्या मल्होत्रा, प्रियामणी आणि विजय सेतुपती मुख्य भूमिकेत दिसत आहेत. अॅटली दिग्दर्शित जवानची सोशल मीडियावर जोरदार चर्चा रंगत आहे. तसेच हा सिनेमा सोशल मीडियावर जोरदार ट्रेंड करत आहे. हा सिनेमा चाहत्यांना कसा वाटला, याचे ट्विटर रिव्ह्यू समोर आले आहेत, चला मग पाहुयात.

दरम्यान, किंग खानच्या ‘पठाण’नंतर चाहते त्याच्या ‘जवान’ सिनेमाची मोठ्या आतुरतेने वाट पाहत होते. पहाटेपासूनच चाहते सिनेमागृहांबाहेर सिनेमा बघण्यासाठी मोठ्या प्रमाणात गर्दी करत आहेत. तसेच जोरदार सेलिब्रेशन देखील करत आहेत. किंग खानचा हा बहुप्रतिक्षित सिनेमा किती दमदार ओपनिंग करतो, हे लवकरच समजणार आहे.

Exit mobile version