‘जयंती 2’ला बॉक्स ऑफिसवर तुफान प्रतिसाद, दुसऱ्या आठवड्यात 2 कोटी रुपयांचा व्यवसाय

जयंती चित्रपटाला मिळालेल्या यशाच्या पावलावर पाऊल ठेवूनच "जयंती 2"ची वाटचाल सुरू आहे. 'जयंती 2' हा चित्रपट 11 सप्टेंबर रोजी प्रदर्शित झाला.

Untitled Design   2026 09 21T100324.577

Untitled Design 2026 09 21T100324.577

‘Jayanti 2’ receives a tremendous response at the box office : कॉलेजमधील भेदभावाची गंभीर गोष्ट सांगणाऱ्या “जयंती 2” या चित्रपटाने बॉक्स ऑफिसवर दमदार कामगिरी केली आहे. दुसऱ्याच आठवड्यात चित्रपटाचे थिएटर्समधील शोज मोठ्या प्रमाणात वाढले आहेत. जयंती चित्रपटाला मिळालेल्या यशाच्या पावलावर पाऊल ठेवूनच “जयंती 2″ची वाटचाल सुरू आहे. ‘जयंती 2’ हा चित्रपट 11 सप्टेंबर रोजी प्रदर्शित झाला. या चित्रपटाची निर्मिती मेलिओरिस्ट फिल्म स्टुडिओने केली असून चित्रपटाची कथा, संवाद आणि दिग्दर्शन शैलेश बळीराम नरवाडे यांचे आहे. ‘जयंती’ चित्रपटाचा प्रमुख चेहरा असलेला अभिनेता ऋतुराज वानखेडे या चित्रपटात मध्यवर्ती भूमिका साकारत असून पायल जाधव, अभिनेत्री प्रियदर्शनी इंदलकर, रोहिणी हट्टंगडी, देविका दफ्तरदार, विजय निकम, राजकुमार जरांगे, मानसी सुभाष अशी दमदार कलाकारांची फौज आपल्याला या चित्रपटातून भेटीस येणार आहे.

संजीवकुमार हिल्ली यांनी कॅमेरामन म्हणून काम पाहिले असून संकलन फैसल महाडिक यांचे आहे. डॉ. सुहास अंबादे , सुहास मुंडे आणि सौरभ गुरू यांनी लिहिलेल्या गीतांना ओंकारस्वरूप यांचे संगीत लाभले असून पार्श्वसंगीत मंगेश धाकडे यांचे आहे. चंद्रपूरसारख्या भागातून उच्च शिक्षणासाठी शहरात येणाऱ्या पायल नावाच्या एका मुलीची गोष्ट ‘जयंती 2’ या चित्रपटात मांडण्यात आली आहे. उच्च शिक्षण घेऊन शेती करण्याचं स्वप्न पायलनं उराशी बाळगलं आहे. मात्र, कॉलेजमध्ये आल्यावर तिला रॅगिंगला सामोरं जावं लागतं. या त्रासाला केलेल्या विरोधातून एक संघर्ष उभा राहतो.

राज ठाकरेंबाबत वक्तव्य करणं पडलं महागात, महेश मोटेच्या चेहऱ्याला काळं फासलं, डोक्यावर चप्पल ठेवून उठाबशा

त्यात पायलचं काय होतं, तिला न्याय मिळतो का, हे चित्रपटात मांडण्यात आलं आहे. मात्र, केवळ पायलची गोष्ट मांडण्यापुरताच चित्रपट मर्यादित नाही, तर या निमित्ताने कॉलेज प्रशासनाचा दृष्टिकोन, शिक्षक-विद्यार्थ्यांकडून मिळणारी वागणूक, सरकारची भूमिका असे अनेक पदर ही कथा उलगडून दाखवते. आजच्या आधुनिक काळातही होत असलेला भेदभाव हा चित्रपट अधोरेखित करतो. या भेदभावाविषयी नवे प्रश्न उपस्थित करतो. 2021 मध्ये प्रदर्शित झालेल्या ‘जयंती’ हा चित्रपटाने बरीच चर्चा घडवली होती. आता त्या पुढे जाऊन शिक्षण क्षेत्रातील भेदभाव, त्यातील राजकारणाला ‘जयंती 2’ या चित्रपटाने हात घातला आहे. त्यामुळेच बॉक्स ऑफिसवर चित्रपटाला भरभरून प्रतिसाद मिळत आहे.

आजुबाजूला घडणाऱ्या घडामोडींतील एक गंभीर स्वरुपाची, विचार करायला लावणारी गोष्ट प्रेक्षकांच्या पसंतीला उतरली आहे. पहिल्या आठवड्यात राज्यभरातील 150 थिएटर्समध्ये “जयंती 2” चित्रपटाचे शोज लागले होते. मात्र, आठवड्याभरातच चित्रपटाविषयी ‍झालेली चर्चा, चित्रपटाच्या होत असलेल्या कौतुकामुळे शोज वाढले आहेत. दुसऱ्या आठवड्यात 250 हून अधिक थिएटर्समध्ये 500 पेक्षा जास्त शोज आहेत. तसेच चित्रपटाने आतापर्यंत 2 कोटी रुपयांचा टप्पाही गाठला आहे. त्यामुळे पुढील काही दिवस बॉक्स ऑफिसवर जयंती 2 या चित्रपटाचा बोलबाला राहणार असल्याचे दिसून येत आहे.

Exit mobile version