Download App

Ghost Trailer : शिवा राजकुमार ‘गँगस्टर’ तर अनुपम खेर दिसणार धडाकेबाज शैलीत!

Ghost trailer released: कन्नड सुपरस्टार शिव राजकुमार (Jayantilal Gada) अॅक्शन थ्रिलर चित्रपट ‘घोस्ट’ चा ट्रेलर हिंदीत रिलीज करण्यात आला आहे. (Ghost Hindi Movie ) ट्रेलर रिलीज होताच चाहत्यांमध्ये या चित्रपटाबद्दलची उत्सुकता वाढली आहे. (Trailer Released) हा चित्रपट 19 ऑक्टोबरला थिएटरमध्ये प्रदर्शित होणार आहे. (Social media) ‘घोस्ट’मध्ये शिवकुमारसोबत ज्येष्ठ अभिनेते अनुपम खेरही महत्त्वाच्या भूमिकेत बघायला मिळणार आहेत.

देशभरात ‘घोस्ट’ हा सिनेमा सध्या चर्चेचा विषय बनला आहे. कारण जयंतीलाल गडा यांच्या पहिल्या कन्नड चित्रपटाचं हिंदी वर्जन असल्यामुळे या चित्रपटाने सर्वांचीच उत्सुकता वाढवली आहे. चित्रपटाचा ॲक्शन तडका असणारा ट्रेलर रिलीज झाल्यापासून प्रेक्षकांची उत्कंठा शिगेला पोहोचली आहे.

यावेळी चित्रपटाचा फक्त ट्रेलर रिलीज साऊथ सुपरस्टारच्या हस्ते प्रदर्शित झाल्यामुळे हा चित्रपट अधिक खास ठरणार आहे. म्हणजेच पेन मूव्हीज ने घोस्ट या चित्रपटाचे हिंदी व्हर्जन रिलीज केलं असताना अभिनेता धनुषने तमिळ व्हर्जनचे ट्रेलर लॉन्च केले आहे. तसेच या चित्रपटाचं तेलगू व्हर्जन एसएस राजामौली यांनी तर मल्याळम व्हर्जन पृथ्वीराज सुकुमारन यांनी रिलीज केले आहे.

या चित्रपटात अभिनय करणाऱ्या डॉक्टर शिवराज कुमार यांनी कन्नड व्हर्जन रिलीज केल आहे. ॲक्शन तडका असणाऱ्या चित्रपटाचा ट्रेलर चित्रपट हा फुल टू इंटरटेनर असल्यास बघायला मिळत आहे. या चित्रपटात ज्येष्ठ अभिनेते अनुपम खेर यांनीही भूमिका साकारली आहे. ” माझ्या अनेक वर्षांच्या अभिनय प्रवासात पहिल्यांदाच अभिनय करताना मला शहारे आले. घोस्ट मध्ये काम करून मी खूप आनंदी आहे आणि हा चित्रपट प्रेक्षकांना नक्की आवडेल” असं मत अनुपम खेर यांनी ट्रेलर प्रदर्शनाच्या वेळी व्यक्त केलं.

Kangana Ranaut: बॉलिवूडची ‘पंगाक्वीन’ कंगनाच्या ‘तेजस’चा दमदार टीझर पाहिलात का?

तसेच शिवा राजकुमार यांनी सांगितलं आहे की, चाहत्यांनी जे प्रेम मला दिलं त्यासाठी मी स्वतःला भाग्यवान समजतो. चाहत्यांनी माझ्यावर केलेल्या प्रेमासाठी घोस्ट हे माझ्याकडून चाहत्यांसाठी एक गिफ्ट आहे.ॲक्शन ने भरपूर असणाऱ्या या चित्रपटात एका व्यक्तीच्या न्यायाच्या शोधाची कहाणी सांगितली आहे. शक्तिशाली डायलॉग्स आणि स्फोटक ॲक्शन सोबत घोस्ट चित्रपट घोस्ट सिस्टीमला हादरवून टाकण्यासाठी तयार आहे. या चित्रपटाचे दिग्दर्शन श्रीनी यांनी केले असून बिरबल ट्रोलॉजीचा हा दुसरा भाग आहे. येत्या 19 ऑक्टोबरला हा चित्रपट हिंदी, तमिळ, तेलुगू, कन्नड आणि मल्याळम या भाषांमध्ये चित्रपटगृहात प्रदर्शित होणार आहे.

Tags

follow us