Jiah Khan: अभिनेत्री जिया खान (Jiah Khan) हिच्या आत्महत्या प्रकरणी विशेष सीबीआय कोर्ट (CBI Court) आपला निकाल जाहीर केला आहे. (Jiah Khan Suicide Case) जिया खान हिने १० वर्षांपूर्वी आत्महत्या केली होती. (Jiah Khan Case) आज जिया खानच्या मृत्यूप्रकरणावर सीबीआय कोर्ट निकाल दिला आहे, याकडे प्रकरणाकडे सर्वाचेच लक्ष लागले होते.
जिया खानने २०१३ मध्ये आत्महत्या केली होती. तिने आत्महत्येच्या अगोदर एक पत्र लिहिले होते. (Jiah Khan Case) या पत्रामध्ये तिने नेमकं काय लिहिलं होते आणि जियाच्या आत्महत्येनंतर १० वर्षात नेमकं काय घडलं? ते आपण आज बघणार आहोत.
२०१३- ३ जून २०१३ मध्ये जिया खानने मुंबईमधील जुहू येथील तिच्या अपार्टमेंटमध्ये आत्महत्या केली होती. जिया खानच्या घरातून तब्ब्ल ६ पानांची सुसाईड नोट सापडली होती. सीबीआयला मिळालेल्या जियाच्या या पत्रामध्ये सूरज पांचोलीवर अत्याचार, फसवणूक आणि खोटे बोलणे असे अनेक प्रकारचे गंभीर आरोप लावण्यात आले होते.
तसेच जियाने गर्भपाताचा देखील उल्लेख या सुसाईड नोटमध्ये केला होता. जियाच्या मृत्यूच्या काही आठवड्यांनंतर, तिच्या घरामधून जप्त करण्यात आलेल्या ६ पानी पत्राच्या आधारावर सूरज पांचोलीवर आत्महत्येसाठी प्रवृत्त केल्याबद्दलचा गुन्हा दाखल करण्यात आला होता. जिया खानची आई राबिया यांनी त्यांच्या मुलीने आत्महत्या नाहीतर तिचा खून झाल्याचे कोर्टात सांगितले होते.
Actor Sooraj Pancholi acquitted of abetment charges in Jiah Khan suicide case pic.twitter.com/SUM97xLqeP
— ANI (@ANI) April 28, 2023
शेवटी शवविच्छेदन अहवालात मृत्यूचे कारण फाशी हे असल्याचे स्पष्ट झाले होते. यावरून जुलैमध्ये सूरज पांचोलीला जामीन मंजूर करण्यात आला होता. पण त्याला पासपोर्ट जमा करण्यास सांगण्यात आले होते. यानंतर राबिया यांनी या प्रकरणाची सीबीआय चौकशी व्हावी, यासाठी न्यायालयाला विनंती करण्यात आली होती.
२०१४- २०१४ मध्ये जिया खानच्या मृत्यूच्या १ वर्षानंतर सीबीआयने मुंबई पोलिसांकडून तपास घेण्याची मागणी करणारी राबिया यांची याचिका न्यायालयाकडून मान्य करण्यात आली. आदित्य पांचोलीने राबिया यांच्याविरोधामध्ये १०० कोटींचा मानहानीचा खटला देखील दाखल करण्यात आला होता.
तब्बल 10 वर्षांनंतर जिया खान मृत्यू प्रकरणी सुरज पंचोलीची निर्दोष मुक्तता
२०१५- २०१५ मध्ये मे महिन्याच्या सुरवातीला सूरज पांचोलीच्या घरावर सीबीआयने छापा टाकला होता आणि नंतर त्याला चौकशीसाठी अटक करण्यात आली होती. जिया खानच्या आत्महत्येस प्रवृत्त केल्याबद्दल डिसेंबरमध्ये सूरज पांचोलीविरुद्ध पुरवणी आरोपपत्र दाखल करण्यात आले होते.
२०१६- २०१६ मध्ये, सीबीआयने जिया खानच्या मृत्यूचे कारण फाशी असल्याचे सांगत, हत्येची कोणतीही शक्यता नाकारली.
२०१७- २०१७ मध्ये, न्यायालयाने सीबीआयच्या चौकशीच्या विरोधामध्ये राबिया यांनी दाखल केलेली याचिका फेटाळली होती. या प्रकरणाचा तपास करण्यासाठी विशेष तपास पथक (एसआयटी) स्थापन करण्याची रबिया यांची मागणी देखील न्यायालयाने फेटाळली होती. राबिया यांनी आपल्या मुलीला न्याय मिळावा यासाठी पंतप्रधान नरेंद्र मोदी यांना पत्र देखील लिहिले होते. यानंतर सूरज पांचोलीने मुंबई उच्च न्यायालयाला खटला फास्ट चालविण्याची विनंती केली.
Wrestlers Protest: कुस्तीपटूंना अभिनेत्री उर्मिला मातोंडकरचे समर्थन, मदत करण्याची केली विनंती
२०१८- २०१८ सीबीआयच्या विशेष न्यायालयाने सूरज पांचोलीच्या विरोधामध्ये आणखी तपास करण्याची विनंती फेटाळली होती.
२०२१- २०२१ जिया खान मत्यूप्रकरणाचा खटला विशेष सीबीआय न्यायालयाकडे २०२१ मध्ये पुन्हा सोपवण्यात आला होता.
२०२२- २०२२ मध्ये या प्रकरणाला परत नव्याने तपास करण्याची मागणी करणारी राबिया यांची दुसरी याचिका मुंबई उच्च न्यायालयाने फेटाळली होती.
२०२३- २०२३ जिया खानच्या आत्महत्येला १० वर्ष पूर्ण झाली. जिया खान (Jiah Khan) हिच्या आत्महत्या प्रकरणी आज विशेष सीबीआय कोर्ट आपला निकाल जाहीर केला आहे.