जिओ स्टुडिओज् आणि मुंबई फिल्म कंपनीच्या ‘राजा शिवाजी’ चित्रपटाचे रचला इतिहास; शंभर कोटींची कमाई करणारा पहिला मराठी चित्रपट

Raja Shivaji- भारतात १०१.४० कोटी रुपयांची उत्कृष्ट निव्वळ कमाई करून, या चित्रपटाने आपला ब्लॉकबस्टर दर्जा अधिकच मजबूत केला आहे.

Raja Shivaji

Raja Shivaji

Raja Shivaji Film-जिओ स्टुडिओज् आणि मुंबई फिल्म कंपनी निर्मित, रितेश विलासराव देशमुख दिग्दर्शित ‘राजा शिवाजी’ (Raja Shivaji) या चित्रपटाने आपली ऐतिहासिक यशस्वी घोडदौड सुरू ठेवली आहे. भारतात शंभर कोटी रुपयांचा निव्वळ गल्ला पार करणारा पहिला मराठी चित्रपट ठरत आणखी एक नवा विक्रम प्रस्थापित केला आहे. भारतात १०१.४० कोटी रुपयांची उत्कृष्ट निव्वळ कमाई करून, या चित्रपटाने आपला ब्लॉकबस्टर दर्जा अधिकच मजबूत केला आहे.

मराठी चित्रपटासाठी आतापर्यंतचा सर्वात मोठा ओपनिंग डे, सर्वात मोठा ओपनिंग वीकेंड आणि सर्वाधिक एका दिवसातील कलेक्शनसह विक्रमांची नोंद केल्यानंतर, या भव्य चित्रपटाने तिसऱ्या आठवड्यात आणि चौथ्या वीकेंडमध्येही आपली यशस्वी घोडदौड सुरू ठेवली आहे. (Jio Studios and Mumbai Film Company’s film ‘Raja Shivaji’ creates history, becoming the first Marathi film to gross Rs 100 crores)

बॉक्स ऑफिस ब्रेक-अप (भारत निव्वळ):
पहिला आठवडा: ₹५७.७० कोटी
दुसरा आठवडा: ₹२७.०० कोटी
तिसरा वीकेंड: ₹८.४० कोटी

तिसरा आठवडा + चौथा वीकेंड:
१८ वा दिवस (सोमवार): ₹१.२५ कोटी
१९ वा दिवस (मंगळवार): ₹१.४५ कोटी
२० वा दिवस (बुधवार): ₹१.२० कोटी
२१ वा दिवस (गुरुवार): ₹०.९५ कोटी
२२ वा दिवस (शुक्रवार): ₹०.७० कोटी
२३ वा दिवस (शनिवार): ₹१.३५ कोटी
२४ वा दिवस (रविवार): ₹१.४० कोटी

फक्त भारतातील एकूण कमाई: ₹१०१.४० कोटी
मराठी चित्रपटसृष्टीतील एक महत्त्वपूर्ण क्षण असलेला ‘राजा शिवाजी’ हा चित्रपट, छत्रपती शिवाजी महाराजांच्या कालातीत वारशाला प्रचंड अभिमानाने आणि जगभरातील प्रेक्षकांच्या अभूतपूर्व प्रेमासह सन्मानित केले आहे.

Exit mobile version