Ebenezer: A Christmas Carol मध्ये जॉनी डेप दिसणार एबेनेझर स्क्रूजच्या भूमिकेत, ट्रेलर प्रदर्शित

Ebenezer: A Christmas Carol :  चार्ल्स डिकन्स यांच्या जगप्रसिद्ध 'A Christmas Carol' या कालातीत साहित्यकृतीवर आधारित

Ebenezer A Christmas Carol

Ebenezer A Christmas Carol

Ebenezer: A Christmas Carol :  चार्ल्स डिकन्स यांच्या जगप्रसिद्ध ‘A Christmas Carol’ या कालातीत साहित्यकृतीवर आधारित ‘Ebenezer: A Christmas Carol’ या चित्रपटाचा पहिला ट्रेलर सॅन दिएगो कॉमिक-कॉनमध्ये प्रदर्शित करण्यात आला आहे. पॅरामाउंट पिक्चर्सने सादर केलेल्या या ट्रेलरमध्ये जॉनी डेप यांचा एबेनेझर स्क्रूजचा गडद, रहस्यमय आणि प्रभावी अवतार पाहायला मिळत असून, प्रेक्षकांना एका वेगळ्याच सिनेमॅटिक अनुभवाची झलक मिळाली आहे.

या चित्रपटात जॉनी डेप यांनी साकारलेला एबेनेझर स्क्रूज हा कडवट, स्वार्थी आणि कंजूष स्वभावाचा वृद्ध व्यक्ती आहे. मात्र, ख्रिसमसच्या पूर्वसंध्येला त्याच्या आयुष्यात घडणाऱ्या अलौकिक घटनांमुळे त्याचे संपूर्ण आयुष्य बदलून जाते. भूतकाळ, वर्तमानकाळ आणि भविष्यकाळातील आत्म्यांच्या भेटीनंतर स्क्रूजला स्वतःच्या आयुष्यातील निर्णयांचा आणि त्यांच्या परिणामांचा सामना करावा लागतो. या प्रवासातून मुक्ती, पश्चात्ताप, आशा आणि माणुसकीचा प्रभावी संदेश चित्रपटातून मांडण्यात आला आहे.

टी वेस्ट यांनी या चित्रपटाचे दिग्दर्शन केले असून, पटकथा नॅथॅनियल हॅल्पर्न यांनी लिहिली आहे. ही पटकथा चार्ल्स डिकन्स यांच्या प्रसिद्ध लघुकथेवर आधारित असून, मूळ कथेला आधुनिक आणि अधिक गडद दृश्यात्मक स्वरूप देण्याचा प्रयत्न करण्यात आला आहे. चित्रपटात जॉनी डेप यांच्यासोबत अँड्रिया राइसबरो, सॅम क्लॅफ्लिन, डेझी रिडले, आर्थर कॉन्टी, एली बॅम्बर, हेन्री लॉईड-ह्यूज, चार्ली मर्फी, ट्रॅमेल टिलमन आणि इयान मॅककेलन यांच्या महत्त्वपूर्ण भूमिका आहेत.

आदित्य चोप्रा अन् अली अब्बास जफर अनटायटल्ड चित्रपटासाठी पुन्हा एकत्र; अहान पांडे,शर्वरी, ऐश्वर्य ठाकरे आणि बॉबी देओल प्रमुख भूमिकेत!-

पॅरामाउंट पिक्चर्स निर्मित ‘Ebenezer: A Christmas Carol’ हा चित्रपट नोव्हेंबर 2026 मध्ये भारतभरातील चित्रपटगृहांमध्ये प्रदर्शित होणार असून, जॉनी डेपच्या पुनरागमनामुळे आणि क्लासिक कथेला नव्या स्वरूपात सादर केल्यामुळे या चित्रपटाबाबत प्रेक्षकांमध्ये मोठी उत्सुकता निर्माण झाली आहे.

Exit mobile version