Download App

Journey Release Date: असामान्य संघर्षाची ‘जर्नी’ लवकरच उलगडणार, ‘या’ तारखेला होणार प्रदर्शित

Journey Release Date: एका असामान्य संघर्षाच्या प्रवासाची कहाणी उलगडणारा ‘जर्नी’ सिनेमा येत्या ६ ऑक्टोबर दिवशी सिनेमागृहात प्रदर्शित करण्यात येणार आहे. (Journey Cinema) सचिन दाभाडे फिल्म्स प्रस्तुत, सचिन जीवनराव दाभाडे निर्मित ‘जर्नी’चे नवीन पोस्टर सोशल मीडियाच्या माध्यमातून चाहत्यांच्या भेटीला आला आहे. (Social media) सिनेमामध्ये मुख्य भूमिकेमध्ये शंतनू मोघे, शर्वरी जेमेनीस आणि शुभम मोरे हे कलाकार बघायला मिळणार आहेत.


प्रदर्शित झालेल्या पोस्टरमध्ये भावनिक, कौटुंबिक सिनेमा असल्याचे बघायला मिळत आहे. सिनेमाच्या नवीन पोस्टरमध्ये तिघांच्याही चेहऱ्यावर अतिशय गंभीर भाव बघायला मिळत आहे. त्या तिघांच्याही आयुष्यामध्ये आलेले चढ- उतार, नेमका संघर्ष काय आहे?, त्या संघर्षामुळे तिघांच्याही आयुष्यात त्याचा काय परिणाम होणार, या सगळ्याची ‘जर्नी’ या सिनेमात बघायला मिळणार आहे.

सचिन जीवनराव दाभाडे दिग्दर्शित या सिनेमात अंजली उजवणे, योगेश सोमण, ओमकर गोवर्धन, सुनील गोडबोले, मिलिंद दास्ताने यांच्यासह माही बुटाला आणि निखिल राठोड या बालकलाकारांच्या मुख्य भूमिका आहेत. रवींद्र मठाधिकारी लिखित या सिनेमाची कथा सचिन दाभाडे यांची आहे तर भास्कर देवेंग्रेकर, तानाजी माने, संतोष राठोड, अनिकेत अरविंद बुटाला सहनिर्माते आहेत.

Amitabh Bachchan अन् किंग खान दिसणार एकत्र; आगामी प्रोजेक्टची आणखी एक झलक पाहिलात का?

सिनेमाविषयी दिग्दर्शक सचिन जीवनराव दाभाडे सांगितले आहे की, “एका लहान मुलाच्या असामान्य प्रवासाची ही कथा असणार आहे. त्याचा हा जीवनप्रवास या मुलाला कोणत्या वळणावर घेऊन जाते. हे ‘जर्नी’मध्ये बघायला मिळणार आहे. आयुष्यातील प्रवास आपल्याला खूप काही शिकवून जातो. ‘जर्नी’तील प्रवास हा कुटुंबाशी, नात्यांशी आणि स्वतःशी असलेली लढाई आहे. कुटुंबात सर्वानी बघावा असा हा सिनेमा आहे. या प्रवासाच्या दरम्यान खूप गोष्टी उलगडत जाणार आहेत.

Tags

follow us