Download App

ज्योती चांदेकर यांच्या पार्थिवावर अंत्यसंस्कार; शेवटचा निरोप देताना लेकीला फुटला अश्रूंचा बांध

ज्येष्ठ अभिनेत्री ज्योती चांदेकर यांच्यावर रविवारी सकाळी ११ वाजता पुण्यातील नवी पेठ येथील वैकुंठ स्मशानभूमीत अंत्यसंस्कार करण्यात आलेत

  • Written By: Last Updated:

jyoti chandekar funeral : मराठी चित्रपट आणि नाट्यसृष्टीतील ज्येष्ठ अभिनेत्री ज्योती चांदेकर (Jyoti Chandekar) यांच्यावर रविवारी सकाळी  पुण्यातील नवी पेठ येथील वैकुंठ स्मशानभूमीत (Vaikuntha Crematorium) अंत्यसंस्कार करण्यात आलेत. वयाच्या ६९व्या वर्षी शनिवारी (१६ ऑगस्ट) पुण्यातील दीनानाथ मंगेशकर रुग्णालयात (Dinanath Mangeshkar Hospital) अल्पशा आजाराने त्यांचे निधन झाले. त्यांच्या निधनाने मराठी चित्रपटसृष्टीवर शोककळा पसरली असून, चाहत्यांनी आणि सहकलाकारांनी त्यांना भावपूर्ण श्रद्धांजली वाहिली.

बीडच्या आष्टी तालुक्यातील धक्कादायक घटना; महिला सरपंचाला अश्लील भाषेत शिवीगाळ 

ज्योती चांदेकर यांच्यावर दुपारी १२ वाजून ५ मिनिटांनी येथील विद्युत दाहिनीमध्ये दाहसंस्कार करण्यात आले. यावेळी यावेळी त्यांची मुलगी, प्रसिद्ध अभिनेत्री तेजस्विनी पंडित, कुटुंबीय, आणि मराठी चित्रपटसृष्टीतील अनेक मान्यवर उपस्थित होते. मनसे अध्यक्ष राज ठाकरे यांनीही अंत्यसंस्काराला हजेरी लावली. मुखाग्नी दिल्यानंतर तेजस्विनी पंडीत भावूक झाल्या होत्या, त्यांना यांना अश्रूंचा बांध फुटला होता.

दरम्यान, ज्योती चांदेकर यांनी आपल्या पाच दशकांच्या कारकिर्दीत मराठी रंगभूमी, चित्रपट आणि मालिकांमधून प्रेक्षकांच्या मनात विशेष स्थान निर्माण केले. त्यांनी वयाच्या १२व्या वर्षी नाट्यसृष्टीत पदार्पण केले होते. ‘सुंदर मी होणार’ या नाटकातून त्यांनी अभिनयाला सुरुवात केली होती. ‘मी सिंधूताई सपकाळ’, ‘तिचा उंबरठा’, ‘सुखांत’ यांसारख्या चित्रपटांमधील त्यांच्या भूमिका गाजल्या.

बावनकुळेंचा PA असल्याची बतावणी करत शेतकऱ्याला घातला गंडा, अज्ञाताविरुध्द गुन्हा दाखल 

‘ठरलं तर मग’ या मालिकेत त्यांनी साकारलेली पूर्णा आजीची भूमिका प्रेक्षकांच्या विशेष पसंतीस उतरली होती. त्यांनी झी गौरव पुरस्कारासह २००हून अधिक पुरस्कार पटकावले, यात मानाचा बालगंधर्व जीवनगौरव पुरस्काराचाही समावेश आहे.

मायलेकींनी केल होतं एकत्र काम..
ज्योती चांदेकर यांनी मराठीसह हिंदी चित्रपट आणि मालिकांमध्येही काम केले. ‘मी सिंधूताई सपकाळ’ चित्रपटात त्यांनी आणि तेजस्विनी यांनी एकत्र काम केले होते, ज्याची चर्चा आजही होते. त्यांच्या जाण्याने मराठी कलाविश्वात पोकळी निर्माण झाली असून मनोरंजन विश्वात हळहळ व्यक्त होत आहे. चाहत्यांनी सोशल मीडियावर त्यांच्या आठवणींना उजाळा देत श्रद्धांजली वाहिली.

follow us