Actress Tanuja: अभिनेत्री तनुजा यांची तब्येत खालावल्याने रुग्णालयात दाखल; आता कशी आहे प्रकृती?

Tanuja Hospitalised: जुन्या काळातील सुप्रसिद्ध चित्रपटातील दिग्गज अभिनेत्री तनुजा (Actress Tanuja) यांची प्रकृती खालावली आहे. तनुजा यांना मुंबईतील जुहू येथील रुग्णालयात दाखल करण्यात आले आहे. (Mumbai News) सध्या हॉस्पिटलच्या आयसीयूमध्ये (ICU) त्यांना दाखल केले आहे. परंतु, अद्याप कारण मात्र स्पष्ट झालेलं नाही. View this post on Instagram   A post shared by Tanishaa Mukerji (@tanishaamukerji) […]

Actress Tanuja: अभिनेत्री तनुजा यांची तब्येत खालावल्याने रुग्णालयात दाखल; आता कशी आहे प्रकृती?

Actress Tanuja: अभिनेत्री तनुजा यांची तब्येत खालावल्याने रुग्णालयात दाखल; आता कशी आहे प्रकृती?

Tanuja Hospitalised: जुन्या काळातील सुप्रसिद्ध चित्रपटातील दिग्गज अभिनेत्री तनुजा (Actress Tanuja) यांची प्रकृती खालावली आहे. तनुजा यांना मुंबईतील जुहू येथील रुग्णालयात दाखल करण्यात आले आहे. (Mumbai News) सध्या हॉस्पिटलच्या आयसीयूमध्ये (ICU) त्यांना दाखल केले आहे. परंतु, अद्याप कारण मात्र स्पष्ट झालेलं नाही.


तनुजा यांची प्रकृती खालावली ?

पीटीआयच्या वृत्तानुसार, दिग्गज अभिनेत्री तनुजा निरीक्षणाखाली असून आता तिची प्रकृती सुधारत आहे. काळजी करण्याची गरज नाही.  80 वर्षीय अभिनेत्री तनुजा सध्या डॉक्टरांच्या देखरेखीखाली असून त्यांच्या तब्येतीवर सतत लक्ष ठेवले जात आहे. अभिनेत्री काजोल देवगणच्या आईला वयोमानाच्या त्रासामुळे रविवारी जुहू येथील रुग्णालयात दाखल करण्यात आले होते.

अनेक हिंदी आणि बंगाली चित्रपटांमध्ये काम केले

अभिनेत्री तनुजा यांनी अनेक हिंदी आणि बंगाली चित्रपटांमध्ये काम केले आहे. तनुजा ही जुनी स्टार शोभना समर्थ आणि निर्माता कुमारसेन समर्थ यांची मुलगी आहे. तनुजा ही नूतनची बहीण आहे. तनुजाचा जन्म 23 सप्टेंबर 1943 रोजी झाला होता. या अभिनेत्रीने लहान वयातच आपल्या अभिनयाने चाहत्यांना चकित केले. वयाच्या अवघ्या 16 व्या वर्षी तनुजाचा पहिला चित्रपट ‘छबिली’ (1960) रिलीज झाला आणि त्यानंतर ती 1962 मध्ये आलेल्या ‘मेम दीदी’ चित्रपटात दिसली.

Animal Movie Marathi Seen : आधी नकार नंतर होकार, उपेंद्रनं असा साकारला ‘अ‍ॅनिमल’चा ‘फ्रॅडी’ !

‘या’ चित्रपटांमुळे तनुजा यांची खास ओळख 

तनुजा यांनी ‘बहारें फिर भी आएंगी’, ‘ज्वेल थीफ’, ‘हाथी मेरे साथी’ आणि ‘मेरे जीवन साथी’ यांसारख्या चित्रपटांसाठी ओळखली जाते. तनुजाने अनेक बंगाली चित्रपटही केले आहेत. सोबतच तनुजाने ‘एक बार मुस्कुरा दो’ चित्रपटाच्या सेटवर शोमू मुखर्जीची भेट घेतली. दोघांनी 1973 मध्ये लग्न केले. तनुजाला काजोल आणि तनिषा अशा दोन मुली आहेत.

Exit mobile version