Bollywood OTT : काजोल ते कियारा अडवाणी; बॉलिवूडच्या सिताऱ्यांची ओटीटीवर जादू !

Bollywood OTT : ओटीटी प्लॅटफॉर्मच्या दर्जेदार प्रोजेक्ट्स मुळे मनोरंजनाच्या जगात अलिकडच्या वर्षांत खूप मोठा बदल झाला आहे. प्रसिद्ध बॉलीवूड कलाकारांनीही सध्या ओटीटी वर आपल्या कामाची चमक दाखवली आहे. यामध्ये बॉलीवूडची प्रसिद्ध अभिनेत्री नर्गिस फाखरीने ओटीटी स्पेसमध्ये पदार्पण करून एका नवीन प्रवासाला सुरुवात केली आहे. वाराणसीच्या हृदयात रुजलेली मालिका “ततलुबाज” या आगामी शोमध्ये काम करणार आहे. […]

Bollywood OTT

Bollywood OTT

Bollywood OTT : ओटीटी प्लॅटफॉर्मच्या दर्जेदार प्रोजेक्ट्स मुळे मनोरंजनाच्या जगात अलिकडच्या वर्षांत खूप मोठा बदल झाला आहे. प्रसिद्ध बॉलीवूड कलाकारांनीही सध्या ओटीटी वर आपल्या कामाची चमक दाखवली आहे. यामध्ये बॉलीवूडची प्रसिद्ध अभिनेत्री नर्गिस फाखरीने ओटीटी स्पेसमध्ये पदार्पण करून एका नवीन प्रवासाला सुरुवात केली आहे. वाराणसीच्या हृदयात रुजलेली मालिका “ततलुबाज” या आगामी शोमध्ये काम करणार आहे.

त्यानंतर बॉलीवूडच्या उत्कृष्ट अभिनेत्री पैकी एक म्हणजे काजोल. काजोलने “द ट्रायल” वेब सीरिज मध्ये तिच्या अभिनयाने आणि “लस्ट स्टोरीज 2” मधील तिच्या भूमिकेने ओटीटीच्या जगातही एक पाऊल टाकले आहे. त्यानंतर पंकज त्रिपाठी एक अष्टपैलू अभिनेते आहेत. त्याच्या प्रभावी अभिनयासाठी ते ओळखले जातात. OTT च्या क्षेत्रात एक उत्तम अभिनेता म्हणून त्याची ओळख निर्माण झाली आहे. “मिर्झापूर”, “सेक्रेड गेम्स” आणि “क्रिमिनल जस्टिस” सारख्या आयकॉनिक वेब सिरीजमधील त्यांच्या भूमिकांनी त्यांना आंतरराष्ट्रीय स्तरावर ओळख मिळवून दिली.

बॉलीवूडमधील उगवत्या स्टार कियारा अडवाणीने “लस्ट स्टोरीज” आणि “गिल्टी” सारख्या प्रोजेक्ट्सद्वारे ओटीटी स्पेसमध्येही आपला ठसा उमटवला आहे. डिजिटल लँडस्केपमधील तिचा उपक्रम उद्योगाच्या विकसित होत असलेल्या लँडस्केपला अधोरेखित करतो, जिथे उच्च-स्तरीय प्रतिभा रुपेरी पडद्याच्या पलीकडे संधी शोधत आहे. OTT च्या क्षेत्रातील मनोज बाजपेयी यांचा प्रवास अफलातून “द फॅमिली मॅन”, “रे”, “गुलमोहर” आणि “बंदा” यांसारख्या प्रशंसित वेब सीरिज मध्ये त्यांनी काम करून आपल्या अभिनयाची जादू दाखवून दिली आहे.

Exit mobile version