Download App

‘कल्की 2898 एडी’ ओटीटीवर धुमाकूळ घालण्यास सज्ज; घरबसल्याही पाहता येणार! कधी आणि कुठे? जाणून घ्या…

Kalki 2898 AD OTT Release Date: प्रभास (Prabhas) स्टारर सायन्स फिक्शन फिल्म 'कल्की 2898 एडी' (Kalki 2898 AD ) बॉक्स ऑफिसवर खळबळ माजली

Kalki 2898 AD OTT Release Date: प्रभास (Prabhas) स्टारर सायन्स फिक्शन फिल्म ‘कल्की 2898 एडी’ (Kalki 2898 AD ) बॉक्स ऑफिसवर खळबळ माजली आहे आणि 2024 च्या सर्वाधिक कमाई करणाऱ्या चित्रपटांपैकी एक बनला आहे. नाग अश्विन दिग्दर्शित एपिक आणि ॲक्शन ड्रामा 27 जून रोजी जगभरात सहा भाषांमध्ये प्रदर्शित झाला. या चित्रपटाने देशभरात आणि जगभरात बॉक्स ऑफिसवर (box office) जबरदस्त कामगिरी केली आहे आणि प्रचंड कमाई केली आहे. तिसऱ्या आठवड्यातही या चित्रपटाला प्रेक्षकांचा उदंड प्रतिसाद मिळत आहे. आता चाहतेही चित्रपटाच्या डिजिटल पदार्पणाची आतुरतेने वाट पाहत आहेत. हा चित्रपट ओटीटीवर (OTT) कधी आणि कुठे प्रदर्शित होणार आहे, चला तर जाणून घेऊया….


‘कल्की 2898 एडी’ ओटीटीवर कधी आणि कुठे प्रदर्शित होईल?

‘कल्की 2898 एडी’ चित्रपटगृहांमध्ये धुमाकूळ घालत आहे. या चित्रपटाला प्रेक्षकांचा जबरदस्त प्रतिसाद मिळत आहे, तर देशांतर्गत बाजारात हा चित्रपट 600 कोटींच्या आकड्यापासून इंच दूर आहे, तर जगभरात चित्रपटाने 1000 कोटींची कमाई केली आहे. या सगळ्या दरम्यान, चित्रपटाच्या ओटीटी रिलीजविषयी माहिती आता समोर आली आहे.

मिळालेल्या माहितीनुसार ‘कल्की 2898 एडी’ च्या निर्मात्यांनी थिएटरमध्ये रिलीज झाल्यानंतर 10 आठवड्यांनंतर चित्रपट ओटीटी प्लॅटफॉर्मवर प्रदर्शित करण्याची योजना आखली आहे, म्हणजेच सप्टेंबरच्या सुरुवातीला हा चित्रपट स्ट्रीमिंग सेवांवर प्रदर्शित केला जाणार आहे. प्राइम व्हिडिओ इंडियाने तेलुगु, तमिळ, कन्नड आणि मल्याळमसह प्रादेशिक आवृत्त्यांसाठी स्ट्रीमिंग अधिकार सुरक्षित केले आहेत, तर नेटफ्लिक्स इंडियाने हिंदी आवृत्तीसाठी हक्क खरेदी केले आहेत. या प्लॅटफॉर्मवर अचूक रिलीजची तारीख अद्याप जाहीर केलेली नाही.

Kalki 2898 AD : ‘कल्की 2898 एडी’ च्या सिक्वेलची चर्चा होताच दिग्दर्शकांनी थेटच सांगितले, म्हणाला

‘कल्की 2898 एडी’ स्टार कास्ट

‘कल्की 2898 एडी’ च्या स्टार कास्टबद्दल बोलायचे झाले तर, नाग अश्विन दिग्दर्शित या चित्रपटात प्रभास, दीपिका पदुकोण, अमिताभ बच्चन आणि कमल हासन आणि इतर कलाकारांनी महत्त्वपूर्ण भूमिका साकारल्या आहेत. हा चित्रपट 600 कोटींच्या प्रचंड बजेटमध्ये बनवण्यात आला असून या चित्रपटाने त्याच्या खर्चापेक्षा कितीतरी जास्त कमाई केली आहे. या चित्रपटाने बॉक्स ऑफिसवर अजूनही आपली मजबूत पकड कायम ठेवली आहे.

follow us