Download App

Kalki 2898 AD : ‘कल्की 2898 एडी’च्या सिक्वेलची चर्चा होताच दिग्दर्शकांनी थेटच सांगितले, म्हणाला…

Kalki 2898 AD Sequel: पॅन इंडियाचा स्टार प्रभास (Prabhas) त्याच्या 'कल्की 2898 एडी'साठी (Kalki 2898 AD) जोरदार चर्चेत आला आहे.

Kalki 2898 AD Sequel: पॅन इंडियाचा स्टार प्रभास (Prabhas) त्याच्या ‘कल्की 2898 एडी’साठी (Kalki 2898 AD) जोरदार चर्चेत आला आहे. त्याचा हा चित्रपट बॉक्स ऑफिसवर (Box Office) वेगाने कमाई करताना दिसत आहे. 600 कोटींच्या बजेटमध्ये बनलेल्या या चित्रपटाने 6 दिवसात जगभरात 700 कोटींचा टप्पा पार केला आहे. ‘कल्की 2898 एडी’चे यश देश-विदेशात पाहायला मिळत आहे. या आठवड्याच्या अखेरीस प्रभास, दीपिका पदुकोण (Deepika Padukone) आणि अमिताभ बच्चन यांचा हा पिक्चर 1000 कोटींचा आकडा पार करू शकतो. दरम्यान या चित्रपटाच्या सिक्वेलबाबत एक मोठी माहिती समोर आली आहे.


नाग अश्विनच्या दिग्दर्शनाखाली बनलेला ‘कल्की 2898 एडी’ चांगली कमाई करत आहे. नाग अश्विनने पहिल्या भागाच्या शेवटी आधीच कल्की युनिव्हर्स सुरू ठेवण्याची घोषणा केली होती, त्यानंतर चाहते चित्रपटाच्या सिक्वेलची आतुरतेने वाट पाहत आहेत. अलीकडेच, चित्रपटाच्या निर्मात्या अश्विनी दत्त यांनी सांगितले की ‘कल्की 2898 एडी’च्या दुसऱ्या भागाचा 60 टक्के काम पूर्ण झाला आहे.

तिच्या नवीन निवेदनात अश्विनी दत्तने सांगितले की, कल्कीच्या सिक्वेलचे शूटिंग या वर्षाच्या अखेरीस सुरू केले जाईल. पुढच्या वर्षी मे किंवा जूनमध्ये चित्रपटगृहात प्रदर्शित करण्याचा निर्मात्यांनी विचार केला आहे. हे अपडेट समोर आल्यानंतर प्रभासचे चाहते खूपच उत्साहित झाले आहेत. सध्या प्रेक्षक ‘कल्की 2898 एडी’ चा आनंद घेत आहेत. प्रभासच्या या चित्रपटाने भारतात एका आठवड्यात जवळपास 400 कोटींची कमाई केली आहे.

Kalki 2898 AD: परदेशात प्रभासच्या ‘कल्कि 2898 AD सिनेमाचा डंका,’या’ चार सिनेमांचा रेकॉर्ड ब्रेक करत रचला इतिहास

सुपरस्टार प्रभासचे चाहते त्याच्या चित्रपटातील कामगिरीने खूप खूश आहेत. निर्मात्यांची मोठी बाजीही यशस्वी ठरली आहे. कमल हसन, दिशा पटानी, राजेंद्र प्रसाद, शोभा यांच्यासह अनेक स्टार्सही या चित्रपटात आहेत. चित्रपटात अनेक कॅमिओ आहेत, जे प्रेक्षकांना खूप प्रभावित करत आहेत. चित्रपट पाहिल्यानंतर सगळेच अमिताभ बच्चन यांना खरा हिरो म्हणत आहेत. त्यांच्या या कामाचे खूप कौतुक होत आहे.

follow us

वेब स्टोरीज