Download App

Kangana Ranaut: अभिनेत्रीने प्रचारादरम्यान थेट बिग बीं यांच्यासोबत केली स्वतःची तुलना, म्हणाली…

Kangana Ranaut : कंगना रणौत हीने तिच्या निवडणूक प्रचारादरम्यान अमिताभ बच्चन यांच्यासोबत स्वत:ची तुलना केली आहे.

Kangana Ranaut On Amitabh Bachchan: अभिनेत्री कंगना रणौत (Kangana Ranaut )सध्या चांगलीच जोरदार चर्चेत आली आहे. (Lok Sabha Election) कंगना हिमाचल प्रदेशातील मंडी विभागातून लोकसभा निवडणुकीची उमेदवार आहे. कंगना तिच्या प्रचारासाठी अनेक वेगवेगळ्या ठिकाणी जात आहे.  अशातच एका सभेमध्ये कंगनाने बोलता बोलता स्वतःची तुलना थेट बॉलीवूडचे (Bollywood) बिग बीं (Amitabh Bachchan) यांच्याशी केली आहे. त्यामुळे कंगनाला चाहत्यांनी चांगलच ट्रोल करत फटकारलं आहे. कंगना सभेत असं नेमकं काय म्हणाली.?


कंगनाने बिग बीं यांच्याशी केली स्वतःची तुलना

कंगनाचा एका सभेमध्ये म्हणाली की, “सध्या संपूर्ण देश चिंतेत आहे. मी तुमची कंगना प्रचारासाठी राजस्थानला जाते, पश्चिम बंगालला जाते, मी दिल्लीला जाते अथवा मणिपूरला… मला लोकांकडून खूप प्रेम आणि आदर मिळत आहे. मी खात्रीने सांगू शकते की अमिताभ बच्चन यांच्यानंतर इंडस्ट्रीत कोणाला इतकं प्रेम आणि आदर मिळत असेल तर तो फक्त मला मिळाला आहे.

Kaasra: शेतीप्रधान विषयावरील गोष्ट सांगणाऱ्या ‘कासरा’ चित्रपटाचा ट्रेलर रिलीज

कंगनाने हे वक्तव्य केल्याने अनेकांनी तिच्यावर टीकेची झोड सुरु केली आहे. कंगनाने स्वतःची तुलना थेट बिग बींशी केल्याची गोष्ट अनेकांना चांगलीच खटकली आहे. त्यामुळे तिला सध्या मोठ्या प्रमाणात ट्रोल केलं जात आहे. दरम्यान कंगना रणौत यंदाच्या लोकसभा निवडणुकीला भारतीय जनता पार्टीची उमेदवार म्हणून मंडी विभागातून उभी आहे. हिमाचल प्रदेशातील मंडी विभागात कंगना भाजपाची उमेदवार आहे. कंगना तिच्या प्रचारासाठी अनेक ठिकाणी जात असल्याचे पाहायला मिळत आहे.

follow us

वेब स्टोरीज