हिंदी भाषेवरून Prakash Raj यांची अमित शाहांवर जोरदार टीका; यावर कंगनाने थेट म्हणाली…

Kangana Ranaut: बॉलीवूड अभिनेत्री कंगना रणौत (Kangana Ranaut) कायम तिच्या परखड वक्तव्यांमुळे जोरदार चर्चेत असते. ती सोशल मीडियावर (Social media) कायम सक्रिय आहे, तरी अनेक मुद्द्यांवर आपली मतं व्यक्त करत असते. गृहमंत्री अमित शाह (Amit Shah) यांनी हिंदी दिनानिमित्त (Hindi Day) भाषण केले होते, यावर अभिनेते प्रकाश राज (Prakash Raj) यांनी त्यांच्यावर जोरदार टीका बघायला […]

Kangana Ranaut

Kangana Ranaut

Kangana Ranaut: बॉलीवूड अभिनेत्री कंगना रणौत (Kangana Ranaut) कायम तिच्या परखड वक्तव्यांमुळे जोरदार चर्चेत असते. ती सोशल मीडियावर (Social media) कायम सक्रिय आहे, तरी अनेक मुद्द्यांवर आपली मतं व्यक्त करत असते. गृहमंत्री अमित शाह (Amit Shah) यांनी हिंदी दिनानिमित्त (Hindi Day) भाषण केले होते, यावर अभिनेते प्रकाश राज (Prakash Raj) यांनी त्यांच्यावर जोरदार टीका बघायला मिळाले होते. यावर आता कंगनाने खोचक अशी प्रतिक्रिया दिली आहे.


हिंदी दिनानिमित्त अमित शाह यांनी हिंदी दिवसाचे महत्त्व सांगितले होते. देशातील सर्वात मोठी लोकशाही असलेल्या भारतातील भाषांच्या विविधतेला जोडणाऱ्या भाषेचं नाव हिंदी आहे. स्वातंत्र्य चळवळीपासून ते आजपर्यंत हिंदी या भाषेने देशाला जोडण्यामध्ये महत्त्वाची भूमिका बजावली आहे, असं ते यावेळी म्हणाले होते.


तसेच हे भाषण एएनआयने शाह एक्सवर (पूर्वीचे ट्विटर) शेअर केले आहे. अमित शाहांचा व्हिडीओ शेअर करत प्रकाश राज यांनी त्यांच्यावर जोरदार टीका करत लिहिलं आहे की, “तुम्ही हिंदी बोलता कारण तुम्हाला हिंदी येते… तुम्ही आम्हाला हिंदी बोलण्यास सांगता कारण तुम्हाला… फक्त… हिंदी येते. तसेच प्रकाश राज यांनी स्टॉप हिंदी डे हा हॅशटॅग देखील वापरला असल्याचे दिसत आहे.

Dunki: किंग खानची मोठी घोषणा; या दिवशी प्रदर्शित होणार ‘डंकी’

यावर आता उत्तर देत कंगना म्हणाली आहे की, अमित शाह गुजरातचे आहेत, त्यांची मातृभाषा गुजराती आहे. दरम्यान, प्रकाश राज यांनी हिंदीवर प्रश्न उपस्थित करण्याची ही पहिली वेळ नाही. याअगोदर देखील अनेकदा त्यांनी हिंदीला विरोध केल्याचे बघायला मिळाले आहे.

https://www.youtube.com/watch?v=6T2Jqhk8vEI

Exit mobile version