Download App

Kangana Ranaut Good News, चाहत्यांनी केला अभिनंदनाचा वर्षाव

  • Written By: Last Updated:

नवी मुंबई : बॉलिवूड क्वीन (Bollywood Queen) कंगना रणौत (Kangana Ranaut) नेहमीच वेगवेगळ्या कारणांनी चर्चेत असते. वादग्रस्त विधानाने तिने बॉलिवूडमधील अनेकांशी पंगा घेतला आहे. 2021 मध्ये आक्षेपार्ह ट्विटनंतर तिचे ट्विटर (Twitter) अकाउंट सस्पेंड झाले होते.

सध्या ती ‘इमर्जन्सी’ चित्रपटाच्या प्रमोशनमध्ये व्यस्त आहे. पण तिने चाहत्यांसाठी एक गुडन्यूज दिली आहे. तिचे बंद झालेले ट्वीटर अकाऊंट आता पुन्हा एकदा सुरु झाले आहे.

कंगना रणौत पुन्हा एकदा दीड वर्षानंतर ट्विटरवर परतली आहे. खुद्द कंगनाने तिच्या अकाऊंटवरून ट्विट करत चाहत्यांना ही माहिती दिली आहे.

बॉलिवूड अभिनेत्री कंगना रणौतचे ट्विटर अकाऊंट गेल्या वर्षी सस्पेंड करण्यात आले होते. पण आता मायक्रो-ब्लॉगिंग साइटवर परत आली आहे. कंगनाने अलीकडेच तिची सोशल मीडिया टीम हँडल करत असलेल्या ट्विटर अकाउंटवरून ट्विट करत ही माहिती दिली आहे.

कंगनाने तिच्या टीमच्या ट्विटर हँडलवरुन ट्विट करत सांगितले की, ‘सर्वांना नमस्कार, ट्वीटरवर परत आल्याने खूप छान वाटत आहे.’ कंगना रणौतचे चाहते तिच्या ट्वीटला रिट्वीट करीत तिच्यावर अभिनंदनाचा वर्षाव करत आहे.

कंगना रणौत ट्वीट मुळे बरीच चर्चेत आली आहे. टेस्ला प्रमुख एलॉन मस्क यांनी ट्विटरचा ताबा घेतल्यानंतर, कंगना राणौतने आशा व्यक्त केली की ती लवकरच ट्विटरवर परत येईल आणि अखेर तसे झाले. इतकंच नाही तर कंगनाने एलॉन मस्क ट्वीटरच्या प्रमुख पदी आल्यानंतर त्यांच्यावर कौतुकाचा वर्षाव केला होता.

कंगना गेल्या एक वर्षापासून तिच्या अधिकृत इंस्टाग्राम हँडलद्वारे लोकांशी जोडली गेली होती. कारण 9 मे 2021 रोजी या अभिनेत्रीचे ट्विटर अकाऊंट बऱ्याच वादानंतर ब्लॉक करण्यात आले होते.

Tags

follow us