Chetan Kumar Arrested : कन्नड अभिनेता चेतन कुमारला हिंदू धर्माबद्दल वादग्रस्त वक्तव्याबद्दल अटक

बेंगळुरू : कन्नड सिनेसृष्टीतील लोकप्रिय अभिनेता चेतन कुमारच्या (Chetan Kumar) पुन्हा एकदा अडचणीत सापडला आहे. हिंदू धर्माविषयी केलेलं वादग्रस्त ट्वीट अभिनेत्याला चांगलच महागात पडलं आहे. चेतन कुमारला बेंगळुरूमधील शेषाद्रिपुरम येथील पोलिसांनी अटक केली आहे. हिंदू धर्म खोटेपणावर आधारित असल्याचे ट्वीट चेतन कुमारने केलं होतं. Hindutva is built on LIES Savarkar: Indian ‘nation’ began when Rama […]

Important Update Regarding Shreyas Iyer Fitness Has Come Out (75)

Chetan Kumar Arrested

बेंगळुरू : कन्नड सिनेसृष्टीतील लोकप्रिय अभिनेता चेतन कुमारच्या (Chetan Kumar) पुन्हा एकदा अडचणीत सापडला आहे. हिंदू धर्माविषयी केलेलं वादग्रस्त ट्वीट अभिनेत्याला चांगलच महागात पडलं आहे. चेतन कुमारला बेंगळुरूमधील शेषाद्रिपुरम येथील पोलिसांनी अटक केली आहे. हिंदू धर्म खोटेपणावर आधारित असल्याचे ट्वीट चेतन कुमारने केलं होतं.

चेतन कुमारने २० मार्च दिवशी हिंदू धर्मावर भाष्य करणारं एक खळबळजनक ट्वीट केलं होतं. या ट्वीटमध्ये त्याने लिहिलं होतं,”हिंदू धर्म खोटेपणावर आधारित आहे. रावणाचा पराभव केल्यावर राम अयोध्येत परतला आणि तेव्हा भारतीय राष्ट्राची सुरुवात झाली हे खोटं असल्याचं त्यांनी ट्विटमध्ये लिहिलं होत, १९९२ मध्ये बाबरी मशीद ही रामाची जन्मभूमी आहे हे खोटं आहे, उरीगौडा- नांजेगौडा हे टिपूचे मारेकरी- खोटं, हिंदुत्वाचा सत्याने पराभव केला जाणार असल्याचे, सत्य सर्वांसाठी समान आहे”. असे, त्याने ट्वीटमध्ये उल्लेख केला होता.

पुन्हा एकदा वादाच्या भोवऱ्यात

चेतन कुमारचं ट्वीट सोशल मीडियावर व्हायरल होत आहे. या ट्वीटने मोठ्या प्रमाणात गोंधळ उडाला. चेतन कुमारचं नाव याअगोदर देखील अनेकवेळा वादाच्या भोवऱ्यात अडकलं आहे. मागील काही दिवसांअगोदर त्याला हिजाब रो संदर्भातही अटक करण्यात आली होती. त्यावेळी त्याने या प्रकरणाची सुनावणी करणाऱ्या न्यायाधीशांविरुद्ध आक्षेपार्ह ट्वीट केल्याचा आरोप त्याच्यावर लावण्यात आला होता. त्यावेळी आयपीसी कलम 502(2) आणि 504 अंतर्गत गुन्हा नोंद करण्यात आला.

सिनेमागृहामध्ये धुमाकूळ घालणाऱ्या ‘कांतारा’ या सिनेमात एका सीनविषयी देखील त्यांनी वक्तव्य केल्यानंतर चेतन कुमार वादाच्या भोवऱ्यात अडकला होता. धार्मिक भावना दुखावल्याचा आरोप त्याच्यावर करण्यात आला. यानंतर त्याच्या विरोधात तक्रारदेखील नोंदवण्यात आली होती. आता परत एकदा वादग्रस्त ट्वीटमुळे त्याला बेंगळुरूमधील पोलिसांनी अटक केली आहे. बजरंग दलाचे शिवकुमार यांनी त्यांच्या विरोधात फिर्याद दिली आहे. यानुसार ही करवाई करण्यात आली असल्याची माहिती मिळत आहे.

Swara Bhasker Trolls: ‘वास्तव भारतात आभार पाकिस्तानचे, नेटकऱ्यांकडून स्वरा भास्कर टार्गेट

कोण आहे चेतन कुमार

चेतन कुमार हा कन्नड सिनेसृष्टीतील लोकप्रिय अभिनेता आहे. सोशल मीडियावर तो चांगलाच अॅक्टिव्ह असतो. समाजातील वेगवेगळ्या गोष्टींवर तो त्याचं मत मांडत असतो. पण धर्म आणि समानता या मुद्द्यांवरील ट्वीटमुळे तो वादाच्या भोवऱ्यात अडकतो.

Exit mobile version