Hemant Dhome On Jhimma Hindi Remake: हेमंत ढोमे (Hemant Dhome) दिग्दर्शित ‘झिम्मा’ (Jhimma) या सिनेमाची सर्वत्र जोरदार चर्चा सुरू आहे. 2021 मध्ये या मराठी सिनेमाचा पहिला भाग चाहत्यांच्या भेटीला आला होता. यानंतर चाहत्यांच्या मनात दुसऱ्या भागाविषयीची उत्सुकता शिगेला पोहचली आहे. अखेर ‘झिम्मा 2’ (Jhimma 2) येत्या 24 नोव्हेंबरला सिनेमागृहांमध्ये प्रदर्शित करण्यात येणार आहे.
लॉकडाऊननंतर मराठी मनोरंजनसृष्टी गाजवणाऱ्या ‘झिम्मा’ सिनेमाचा करण जोहर हिंदी रिमेक बनवणार असल्याची चर्चा होत आहे. यावर आता एका दिलेल्या मुलाखतीमध्ये या सिनेमाचा दिग्दर्शक हेमंत ढोमे आणि निर्माती क्षिती जोग यांनी खुलासा केलं आहे. ‘झिम्मा’च्या हिंदी रिमेकविषयी हेमंत-क्षितीचं नेमकं काय मत आहे, याबाबत खुलासा केला आहे.
झिम्मा’च्या हिंदी रिमेकविषयी हेमंत ढोमे म्हणाला आहे की, “खरं सांगू का? ही चर्चा सध्या खूपच सुरु आहे…मी स्पष्टपणे नकार देत नाही. मात्र क्षिती आणि करण सरांनी मिळून आताच एक सिनेमा केला आहे. त्याकाळात त्या दोघांची सुद्धा या कथेवर अनेकदा चर्चा रंगली होती. त्यांची चर्चा सुरू असतानाच हिंदी रिमेकचे कलाकार देखील निश्चित करण्यात आले होते पण, कलाकार कोण असतील हे अद्याप ठरलेलं नव्हते. यापेक्षा जास्त मी आता काहीच बोलू शकत नाही.
Aadesh Bandekar यांच्या मुलाची ‘होम मिनिस्टर’ कशी असणार? सोहम बांदेकरने स्पष्टच सांगितलं
पुढे क्षिती जोगने सांगितलं की, “एवढ्या लगेच हा सिनेमा हिंदीमध्ये बनवला जाणार नाही. सध्या फक्त याबद्दलची चर्चा सुरु आहे. 2024 मध्ये वगैरे हिंदी रिमेक प्रदर्शित होईल, असंही काही नाही. ही बायकांची गोष्ट असल्याने मी कधी हा सिनेमाच्या रिमेकला विरोध करणार नाही. सगळ्या भाषेमध्ये सिनेमा झाला पाहिजे, फक्त आमची पात्र त्यांना तेवढ्याच प्रामाणिकपणे मांडता येणे खूप गरजेचे आहे. तो प्रामाणिकपणा जपला, तर या सिनेमातील कलाकार आणि याची निर्माती म्हणून मला सर्वात जास्त आनंद आणि अभिमान असणार आहे.
दरम्यान, बहुचर्चित झिम्माचा 2 भाग येत्या 24 नोव्हेंबर दिवशी चाहत्यांच्या भेटीला येणार आहे. यामध्ये सिद्धार्थ चांदेकर, क्षिती जोग, सुहास जोशी, शिवानी सुर्वे, रिंकू राजगुरू, सुचित्रा बांदेकर, निर्मिती सावंत, सायली संजीव हे कलाकार मुख्य भूमिका साकारणार आहेत.