Kareena’s special post on Saif Ali Khan’s birthday : बॉलिवूड अभिनेता सैफ अली खान आज आपला 56 वा वाढदिवस साजरा करत आहे. या खास दिवसानिमित्त त्याच्यावर चाहत्यांसह चित्रपटसृष्टीतील अनेक कलाकारांकडून शुभेच्छांचा वर्षाव होत आहे. मात्र, सर्वाधिक चर्चेत आहे ती त्याची पत्नी आणि अभिनेत्री करीना कपूर खान हिने केलेली खास पोस्ट. करीनाने सोशल मीडियावर सैफचे काही खास फोटो शेअर करत त्याला अतिशय प्रेमळ आणि हटके शब्दांत वाढदिवसाच्या शुभेच्छा दिल्या आहेत.
करीनाने आपल्या अधिकृत समाजमाध्यम खात्यावर सैफचे विविध मूडमधील काही फोटो पोस्ट केले. या फोटोंसोबत तिने एक भावनिक आणि मजेशीर कॅप्शनही लिहिले. माझ्या कायमच्या साथीदाराला वाढदिवसाच्या खूप खूप शुभेच्छा. तुझ्याशिवाय आयुष्य किती कंटाळवाणं असतं याची कल्पनाही करता येत नाही. आणि हो, या पोस्टमधील सर्व फोटो स्वतः सैफने मंजूर केले आहेत. त्याला मी त्याचे फोटो पोस्ट केलेले खूप आवडतात, असे करीना आपल्या पोस्टमध्ये म्हणाली.
करीनाच्या या पोस्टने सोशल मीडियावर चाहत्यांचे लक्ष वेधून घेतले आहे. अनेक चाहत्यांनी आणि सेलिब्रिटींनीही सैफला शुभेच्छा देताना या जोडीवर प्रेमाचा वर्षाव केला आहे. सैफ आणि करीनाची जोडी बॉलिवूडमधील सर्वाधिक लोकप्रिय आणि चर्चेत असलेल्या जोड्यांपैकी एक मानली जाते. अनेक वर्षांच्या सहजीवनानंतरही दोघांमधील प्रेम, मैत्री आणि परस्पर समजूतदारपणा चाहत्यांना नेहमीच भावतो.
पुण्यात पोलीस ठाण्यातच महिला शिपायाशी गैरवर्तन; वरिष्ठ अधिकाऱ्यांच्या चौकशीनंतर हवालदार निलंबित
सैफ अली खान आणि करीना कपूर यांनी 2012 मध्ये विवाह केला होता. त्यानंतर या जोडप्याला तैमूर आणि जेह ही दोन मुले झाली. सोशल मीडियावर या स्टार कुटुंबाची कायम चर्चा असते. विशेषतः तैमूर आणि जेह यांच्या फोटोंना चाहत्यांकडून मोठी पसंती मिळत असते. सैफ आणि करीना अनेकदा एकमेकांविषयी प्रेम व्यक्त करताना दिसतात आणि त्यांची ही केमिस्ट्री चाहत्यांना नेहमीच आकर्षित करते.
दरम्यान, सैफ अली खानच्या व्यावसायिक आयुष्याबाबत बोलायचे झाल्यास, तो लवकरच ‘हैवान’ या बहुचर्चित चित्रपटातून प्रेक्षकांच्या भेटीला येणार आहे. 11 सप्टेंबर रोजी प्रदर्शित होणाऱ्या या चित्रपटाचे दिग्दर्शन ज्येष्ठ दिग्दर्शक प्रियदर्शन यांनी केले आहे. विशेष म्हणजे प्रियदर्शन आणि सैफ अली खान यांची ही पहिलीच एकत्रित फिल्म असणार आहे. या चित्रपटात सैफसोबत बॉलिवूडचा खिलाडी अक्षय कुमारदेखील महत्त्वाच्या भूमिकेत दिसणार आहे.
भारतीय वंशांचे उद्योगपती लक्ष्मी मित्तल यांच्या कंपनी प्लांटवर मिसाइल हल्ला; 2 ठार
‘हैवान’ या चित्रपटाची घोषणा झाल्यापासूनच प्रेक्षकांमध्ये उत्सुकता निर्माण झाली आहे. प्रियदर्शन यांच्या दिग्दर्शनाची शैली आणि सैफ-अक्षय ही जोडी यामुळे या चित्रपटाकडे विशेष लक्ष लागले आहे. सैफच्या वाढदिवसानिमित्त त्याच्या आगामी चित्रपटाविषयीही चाहत्यांमध्ये मोठी चर्चा रंगली आहे. वाढदिवसाच्या निमित्ताने सैफ अली खानला देशभरातून शुभेच्छा मिळत असताना, करीनाने केलेली प्रेमळ पोस्ट मात्र सर्वाधिक चर्चेचा विषय ठरली आहे. तुझ्याशिवाय आयुष्य किती कंटाळवाणं असतं या एका वाक्यातून करीनाने आपल्या पतीबद्दलचे प्रेम आणि आपुलकी व्यक्त केली असून चाहत्यांनाही ही पोस्ट प्रचंड भावली आहे.
