Films on Kargil War: आजचा दिवस देशातील नागरिकांसाठी खूप महत्त्वाचा आहे. आजच्या दिवशी २४ वर्षांपूर्वी म्हणजेच २६ जुलै १९९९ रोजी भारतीय जवानांनी आपले प्राण पणाला लावत कारगिल युद्धामध्ये पाकिस्तानचा पराभव केला आहे. या युद्धामध्ये ५००पेक्षा जास्त भारतीय जवानांनी देशासाठी बलिदान दिले होते. कारगिल युद्धामध्ये प्राणांची आहुती देणाऱ्या सैनिकांच्या स्मरणार्थ बॉलिवूडमध्ये अनेक हटके सिनेमे बनले आहेत. अशाच काही सिनेमांविषयी जाणून घेणार आहोत.
लक्ष्य : फरहान अख्तर दिग्दर्शित ‘लक्ष्य’ हाही एक गाजलेला सुपरहिट सिनेमा ठरला होता. या सिनेमात हृतिक रोशन, प्रीती झिंटा, अमिताभ बच्चन, म्हणजेच चाहत्यांचे लाडके बिग बी, बोमन इराणी आणि ओम पुरी यांच्या महत्त्वपूर्ण भूमिका दिसून आल्या आहेत. यामध्ये देखील कारगिल युद्धाचे काही चित्रण बघायला मिळणार होते.
गुंजन सक्सेना : बॉलिवूड अभिनेत्री जान्हवी कपूर आणि अभिनेते पंकज त्रिपाठी स्टारर ‘गुंजन सक्सेना’ हा सिनेमा देखील कारगिल युद्धावर आधारित आहे. या सिनेमात जान्हवीने भारतीय हवाई दलातील अधिकारी आणि कारगिल युद्धामध्ये मोलाचे योगदान देणाऱ्या हेलिकॉप्टर पायलट गुंजन सक्सेना यांची भूमिका साकारल्याचे दिसून आले आहे. हा सिनेमा सध्या नेटफ्लिक्सवर पाहता येणार आहे.
करीना कपूर चाहत्यांशी कशी वागली? नारायण मूर्तींनी सांगितला किस्सा
धूप : ओम पुरी, रेवती आणि संजय सुरी स्टारर ‘धूप’ हा सिनेमा देखील कारगिल युद्धावर आधारित असल्याचे दिसून येत आहे. हा सिनेमा देखील २००३मध्ये आला होता. या सिनेमाची कथा ७ जुलै १९९९ रोजी शहीद झालेल्या कॅप्टन अनुज नय्यर आणि त्यांच्या कुटुंबावर आधारित असल्याचे पाह्यला मिळाले आहे.
शेरशाह : कारगिलमध्ये शहीद झालेल्या जवानांमध्ये कॅप्टन विक्रम बत्रा यांचा देखील समावेश आहे. २०२१मध्ये त्यांच्या आयुष्यावर ‘शेरशाह’ नावाचा एक सिनेमा बनवण्यात आला होता. जो देशातील लोकांना खूप आवडल्याचे दिसून आले आहे. या सिनेमात अभिनेत्री सिद्धार्थ मल्होत्राने कॅप्टन विक्रम बत्राची भूमिका साकारले असल्याचे दिसून आले होते. या सिनेमात त्याच्याबरोबर अभिनेत्री कियारा अडवाणी देखील हटके अंदाजात झळकली होती. हा सिनेमा प्राईम व्हिडीओवर देखील आपल्याला पाहायला मिळणार आहे.
एलओसी कारगिल : कारगिल युद्धाची कथा सांगणाऱ्या सिनेमाच्या यादीमध्ये ‘एलओसी कारगिल’ या सिनेमाचा देखील उल्लेख आहे. हा सिनेमा २००३मध्ये प्रदर्शित झाला होता. या सिनेमात अजय देवगण, संजय दत्त, अभिषेक बच्चन, सैफ अली खान, सुनील शेट्टी यांसारखे बॉलिवूडचे मुख्य कलाकार पाहायला मिळालं आहे.