Sanjay Kapoor Property War : अभिनेत्री करिश्मा कपूरचा (Karshima Kapoor) घटस्फोटीत पती संजय कपूरच्या 30 हजार कोटींच्या संपत्तीचा वाद न्यायालयात सुरु आहे. या वादात आता एक नवीन अध्याय सुरु झालायं. दिल्ली उच्च न्यायालयात दाखल याचिकांमध्ये करिश्मा कपूर आणि संजय कपूर यांच्यातील संबंधांचा समावेश असल्याचं दिसून आलंय.
न्यायालयात दाखल करण्यात आलेल्या कागदोपत्रांच्या आधारे या केसशी जोडलेल्या व्हॉट्सअॅप चॅट्स आणि रेकॉर्डिंग समोर आले आहेत. यामध्ये दोघांचाही वैयक्तिक चर्चा होत असल्याचं दिसून आलंय.
“जनसुरक्षा विधेयक मागे घ्या, आम्ही सरकारला..”, खा. सुप्रिया सुळेंचा महायुतीला इशारा
संजय कपूर करिश्मा कपूर आणि त्यांच्या मुलांना पोर्तुगीज नागरिकत्व मिळविण्यात मदत करत होते. यासंदर्भातील पुरावे समोर आले असून परदेशी पासपोर्ट मिळविण्यासाठी करिश्माला भारतीय नागरिकत्व सोडावे लागेल, कारण भारत दुहेरी नागरिकत्वाला परवानगी देत नाही.
दिल्ली उच्च न्यायालयाने करिश्मा कपूरच्या दोन्ही मुलांकडून दाखल केलेल्या दिवाणी दाव्यात नोटीस बजावली. संजय कपूरच्या मृत्युपत्राला आव्हान देत आहेत आणि त्यांच्या मालमत्तेचा वाटा मागत आहेत. न्यायमूर्ती ज्योती सिंह यांनी प्रतिवादींना समन्स बजावण्याचे निर्देश दिले, ज्यामध्ये दोन आठवड्यांच्या आत लेखी जबाब आणि त्यानंतर एका आठवड्याच्या आत प्रतिलेख सादर करण्याचे आदेश दिले.
अटल सेतूवरुन शिवडीला जात असताना एका कारचा भीषण अपघात, तरुणाचा जागीच मृत्यू
अंतरिम दिलासा देण्यासाठी नोटीस देखील जारी करण्यात आल्या होत्या, ज्यामध्ये दोन आठवड्यात उत्तरे द्यावी लागतील आणि एका आठवड्यात पुन्हा उत्तर द्यावे लागणार आहे.
दरम्यान, या प्रकरणाची सुनावणी ९ ऑक्टोबर रोजी होणार आहे. न्यायालयाने संजय कपूर यांच्या प्रिया सचदेवा कपूर यांना मृतांच्या सर्व जंगम आणि अचल मालमत्तेची विस्तृत यादी सादर करण्याचे आदेश दिले.