Karnataka Film Chamber aggressive over Pahalgam statement; Boycotts Sonu Nigam, demands apology : कर्नाटक फिल्म चेंबर्स ऑफ कॉमर्स यांनी गायक सोनू निगमला पूर्णपणे बहिष्कृत करण्याचा निर्णय घेतला आहे. एका संगीत कार्यक्रमामध्ये त्याने केलेल्या पहलगाम हल्ल्यावरील वक्तव्यावरून ही कारवाई करण्यात आली आहे. तसेच त्यांनी सोनू निगमने त्याच्या या वादग्रस्त व्यक्तव्यासाठी कन्नड भाषिकांची जाहीर माफी मागावी. अशी मागणी देखील केली आहे.
काय म्हणाला होता सोनू निगम?
कर्नाटकमधील अवलाहल्ली येथील ईस्ट पॉईंट कॉलेज ऑफ इंजीनियरिंगमध्ये सोनू निगमच्या संगीताचा कार्यक्रम पार पडला. या गाण्याच्या कार्यक्रमाच्या वेळी सोनू निगमला जेव्हा चहात्यांनी कन्नड गाणं गाण्याची विनंती केली. त्यावेळी त्याने कन्नड चाहत्यांच्या या विनंतीची तुलना पहेलगाम दहशतवादी हल्ल्याशी केली त्यावरून सर्वत्र संताप व्यक्त केला जात आहे. त्यामुळे सोनूी निगमवर बहिष्कार टाकण्याच निर्णय कर्नाटक फिल्म चेंबरकडून घेण्यात आला आहे.
युद्धाचं सावट! 1971 च्या भारत-पाक यु्द्धानंतर पुन्हा केंद्रीय गृहमंत्र्यांकडून सुरक्षा मॉक ड्रील
यावर बोलताना सोनू निगम म्हणाला की, यावेळी एका प्रेक्षकाने त्याला कन्नडमध्ये गायला सांगितले होते. ही घटना सांगताना सोनू निगम म्हणाला की, मी गायलेली सर्वोत्तम गाणी कन्नडमध्ये आहेत. मात्र ज्या मुलाने मला कन्नडमध्ये गाण्याचे सांगितले ते मला आवडले नाही. कारण तो खूप उद्धटपणे धमकी देऊन बोलत होता. आणि पहलगाम हल्ल्याचे हेच कारण आहे. त्यावरून कर्नाटकमधील लोकांसह चित्रपटसृष्टीतील लोकांनी आमच्या कन्नड भाषेच्या अभिमानाची तुलना दहशतवादाशी केल्याने आमच्या भावना दुखावण्याचा आरोप केला आहे.