Download App

अजय देवगणनंतर बॉबी देओलची कार्तिक आर्यनशी टक्कर; ‘या’ साउथ सुपरस्टार्सच्या ही अडचणी वाढणार

Karthik Aryan: एकामागून एक अनेक चित्रपट दिल्यानंतर तो दिग्दर्शकांची पहिली पसंती बनला आहे. नुकताच त्याचा ‘चंदू चॅम्पियन’ प्रदर्शित झाला,

Karthik Aryan: एकामागून एक अनेक चित्रपट दिल्यानंतर तो दिग्दर्शकांची पहिली पसंती बनला आहे. नुकताच त्याचा ‘चंदू चॅम्पियन’ (Chandu Champion)प्रदर्शित झाला, त्याला अप्रतिम प्रतिसाद मिळत आहे. कार्तिक आर्यनच्या (Karthik Aryan) अभिनयाचे खूप कौतुक झाले आहे. या चित्रपटाव्यतिरिक्त त्याच्याकडे अनेक मोठे चित्रपट आहेत. सध्या तो ज्या चित्रपटाच्या शूटिंगमध्ये व्यस्त आहे ते म्हणजे ‘भूल भुलैया 3′(Bhool Bhulaiyaa 3 ) या फ्रँचायझीचा हा तिसरा भाग आहे, ज्यामध्ये माधुरी दीक्षित, विद्या बालन आणि तृप्ती डिमरी दिसणार आहेत.


मागील दोन भागांपेक्षा यावेळी मोठा धमाका होणार आहे. कार्तिक आर्यनचा हा चित्रपट दिवाळीला प्रदर्शित होणार आहे.अलीकडेच अजय देवगणने घोषणा केली होती की, त्याचा ‘सिंघम अगेन’ देखील दिवाळीला रिलीज होणार आहे. यापूर्वी हा चित्रपट 15 ऑगस्टला प्रदर्शित करण्याचा निर्णय घेण्यात आला होता. मात्र निर्मात्यांनी त्याची तारीख बदलली. ते म्हणाले की, चित्राचे काम अद्याप पूर्ण झालेले नाही. मात्र कार्तिक आर्यनच्या ‘भूल भुलैया 3’साठी अडचणी वाढणार आहेत.

कार्तिक आर्यनच्या अडचणी कोण वाढवणार?

यावर्षी साऊथचे अनेक मोठे चित्रपट प्रदर्शित होणार आहेत. अनेक चित्रपटांच्या प्रदर्शनाच्या तारखा अद्याप जाहीर झालेल्या नाहीत. बहुप्रतिक्षित चित्रपट बॉबी देओलचा ‘कंगुवा’ आणि राम चरणचा ‘गेम चेंजर’ या यादीत समाविष्ट आहेत. दरम्यान एक मोठे अपडेट समोर आली आहे.

Kartik Aaryan: प्रतीक्षा संपली! कधी रिलीज होणार ‘भूल भुलैया 2? अभिनेत्याने केला खुलासा

‘कंगुवा’ची रिलीज डेट 23 जुलै रोजी जाहीर केली जाऊ शकते. खरं तर, निर्माते सूर्याच्या 49 व्या वाढदिवशी ते आणण्याचा विचार करत आहेत. शिवाच्या दिग्दर्शनाखाली बनत असलेला हा चित्रपट ऑक्टोबर 2024 च्या शेवटच्या आठवड्यात म्हणजेच दिवाळीला प्रदर्शित करण्याची जोरदार चर्चा होत असल्याचे सांगितले जात आहे.

follow us

वेब स्टोरीज