Download App

Satyaprem Ki Katha Teaser:  रोमँटिक अंदाजात दिसले कार्तिक-कियारा, ‘SatyaPrem Ki Katha’ सिनेमाचा टीझर रिलीज

  • Written By: Last Updated:

Satyaprem Ki Katha Teaser: बॉलिवूडमधील प्रसिद्ध अभिनेत्री कियारा अडवाणी (Kiara Advani) आणि अभिनेता कार्तिक आर्यन (Kartik Aaryan) यांची जोडी चाहत्यांना पुन्हा एकदा रुपेरी पडद्यावर पाहायला मिळणार आहे. कियारा आणि कार्तिक यांच्या ‘सत्यप्रेम की कथा’ (Satyaprem Ki Kath) या सिनेमांचा टीझर नुकताच चाहत्यांच्या भेटीला आला आहे.


या टीझरमध्ये कार्तिक आणि कियारा यांचा रोमँटिक अंदाज चाहत्यांना पाहायला मिळाला आहे. ‘सत्यप्रेम की कथा’ या सिनेमाचा टीझर कियारा अडवाणीने इंस्टाग्राम अकाउंटवर शेअर केला आहे. ‘बाते जो कभी पूरी ना हों, वादे जो अधूरे हों, हंसी जो कभी कम ना हो’ या कार्तिक आर्यनच्या डायलॉगने  ‘सत्यप्रेम की कथा’ या सिनेमाच्या टीझरला सुरुवात होते.

कियाराने हा टीझर सोशल मीडियावर शेअर करुन त्याला कॅप्शन दिले आहे की, आजपासून सुरु होत आहे, ‘सत्यप्रेम की कथा’ कियारानं शेअर केलेल्या या ‘सत्यप्रेम की कथा’  सिनेमाच्या टीझरला चाहत्यांनी मोठी पसंती दिली आहे

या दिवशी होणार रिलीज 

‘सत्यप्रेम की कथा’ हा सिनेमा 29 जून रोजी चाहत्यांच्या भेटीला येणार आहे. भूल भुलैया-2 या सिनेमानंतर कार्तिक आणि कियारा यांची जोडी ‘सत्यप्रेम की कथा’ या सिनेमात बघण्यासाठी चाहत्यांना मोठी उत्सुकता लागली आहे. कार्तिकचा गेल्या काही दिवसांपासून शेहजादा हा सिनेमा चाहत्यांच्या भेटीला आला होता. या सिनेमाने बॉक्स ऑफिसवर मोठी कमाई केली नाही. तर कियाराचा जुग जुग जियो हा सिनेमा गेल्या काही दिवसांपूर्वी रिलीज झाला आहे.

Adipurush: ‘आदिपुरुष’ चित्रपटाच्या वादात अभिनेता प्रभासच्या पोस्टरनं वेधलं लक्ष

या सिनेमाने बॉक्स ऑफिसवर 100 कोटींहून जास्त प्रमाणात कमाई केली आहे. आता कार्तिक आणि कियारा यांच्या ‘सत्यप्रेम की कथा’ या सिनेमाला चाहत्यांची मोठी पसंती मिळेल की नाही? या प्रश्नाचे उत्तर लवकरच चाहत्यांना मिळणार आहे.

Tags

follow us