Download App

पाकिस्तानी खेळाडू नापास, बोर्ड पगार कापणार; सीनियर खेळाडूंना बसणार कोट्यावधींचा फटका

पाकिस्तान क्रिकेट बोर्डाने खेळाडूंना मोठा झटका देण्याची तयारी केली आहे. खेळाडूंच्या खराब प्रदर्शनामुळे बोर्ड नाराज आहे.

Pakistan Cricket News : पाकिस्तान क्रिकेट बोर्डाने खेळाडूंना मोठा झटका देण्याची (Pakistan Cricket Board) तयारी केली आहे. खेळाडूंच्या खराब प्रदर्शनामुळे बोर्ड नाराज आहे. त्यामुळे खेळाडूंच्या पगारात कपात करण्याची तयारी केली जात आहे. जर बोर्डाने हा निर्णय घेतला तर याचा सर्वाधिक फटका टीममधील सीनियर खेळाडूंना बसणार आहे. या हालचालींनी खेळाडूंमध्ये खळबळ उडाली आहे. पगारात कपात होऊ द्यायची नसेल तर प्रदर्शनात सुधारणा करणे हाच पर्याय त्यांच्यासमोर आता शिल्लक राहिला आहे.

पाकिस्तान क्रिकेट टीमची कामगिरी सातत्याने घसरत चालली आहे. नुकत्याच झालेल्या एकदिवसीय सामन्यांच्या मालिकेत वेस्टइंडिजने पाकिस्तानचा (West Indies vs Pakistan) पराभव करत इतिहास रचला. मालिका जिंकली. या मालिकेतील शेवटच्या सामन्यात तर विंडीजने तब्बल 202 धावांनी पाकिस्तानला धूळ चारली. याआधी बांग्लादेशनेही टी 20 सीरिजमध्ये पाकिस्तानला (Pakistan vs Bangladesh) पाणी पाजले होते.

पाकिस्तानचा लाजिरवाणा पराभव, 202 धावांनी वेस्टइंडिजने लोळवलं; मालिकाही जिंकली

टीमच्या या खराब कामगिरीमुळे क्रिकेट बोर्ड हैराण झाले आहे. संघातील वरिष्ठ खेळाडूंवर बोर्डातील अधिकारी चांगलेच नाराज झाले आहेत. या खेळाडू्ंना झटका देण्याचा प्लॅन तयार केला जात आहे. बाबर आझम, शाहीन शाह अफ्रिदी यांच्यासह अन्य सीनियर खेळाडूंच्या मानधनात कपात करण्याचा विचार केला जात आहे. आशिया कप स्पर्धा लवकरच सुरू होणार आहे. या स्पर्धेआधी खेळाडूंना 6 कोटी डॉलरचा मोठा झटका देण्याची तयारी सुरू असल्याची माहिती आहे.

बोर्ड खेळाडूंच्या सेंट्ल काँट्रॅक्टमधील एक महत्वाची तरतूद हटवल्यानंतर त्यांच्या पगारात कपात करण्याचा प्लॅन तयार करत आहे. रिपोर्ट्सनुसार पीसीबी सेंट्रल काँट्रॅक्टमधून तीन टक्के आयसीसी महसूल हिस्सेदारी असणारे सेक्शन काढून टाकू शकते. यामुळे खेळाडूंच्या पगारावर परिणाम होऊ शकतो. ही तरतूद दोन वर्षांपूर्वी लागू करण्यात आली होती. खेळाडूंनी यासाठी बोर्डाच्या तत्कालीन अध्यक्षांवर दबाव टाकला होता.

रिपोर्ट्सनुसार खेळाडूंची खराब कामगिरी पाहता आता पीसीबी यू टर्न घेण्याची योजना तयार करत आहे. करारातील खेळाडू्ंना आयसीसी महसुलातील तीन टक्के हिस्सा दिला जाणार नाही. मागील वर्षाच्या तुलनेत रिटेशनशिप खर्चाच्या बजेटमध्ये 37 टक्क्यांची वाढ करण्यात आली आहे. परंतु, खेळाडूंच्या सामना शुल्कात वाढ होण्याची शक्यता दिसत नाही.

किती कमावतात पाकिस्तानी क्रिकेटर

सध्याच्या करारानुसार एक खेळाडूला एका कसोटी सामन्यासाठी जवळपास 12 लाख रुपये मिळतात. प्रत्येक एकदिवसीय सामन्यासाठी सहा लाख रुपये आणि टी 20 सामन्यांसाठी चार लाख रुपये मिळतात. या व्यतिरिक्त ए कॅटेगरीमधील खेळाडूंना 6 लाख 57 हजार 500 रुपये प्रत्येक महिन्यात मिळतात. अशात जर बोर्डाने पगार कपातीचा निर्णय घेतला तर याचा सर्वाधिक फटका टीममधील सीनियर खेळाडूंना बसणार आहे.

क्रिकेटच्या नावाखाली भ्रष्टाचार! IPL 2025 तिकीट घोटाळा प्रकरणी मोठी कारवाई, बडा अधिकारी ताब्यात

follow us