क्रिकेटच्या नावाखाली भ्रष्टाचार! IPL 2025 तिकीट घोटाळा प्रकरणी मोठी कारवाई, बडा अधिकारी ताब्यात

क्रिकेटच्या नावाखाली भ्रष्टाचार! IPL 2025 तिकीट घोटाळा प्रकरणी मोठी कारवाई,  बडा अधिकारी ताब्यात

IPL 2025 Ticket Scam : राजीव गांधी स्टेडियममध्ये केवळ सामने नाही, तर तिकीट घोटाळा रंगला ( IPL 2025 Ticket Scam) होता. सनरायझर्स हैद्राबादच्या तक्रारीने धुमाकूळ उडाला. HCA अधिकारी अटकेत आला. खेळ मैदानावर नाही, ततर स्टेडियमच्या आत सुरु होता. आयपीएल तिकीट ( IPL 2025) घोटाळ्याचा पर्दाफाश झालाय. या प्रकरणात मोठी कारवाई करण्यात आली (Cricket News) आहे.

तिकीट घोटाळ्याप्रकरणी मोठा खुलासा

आयपीएल 2025 दरम्यान हैदराबादमधील राजीव गांधी आंतरराष्ट्रीय क्रिकेट स्टेडियममध्ये झालेल्या तिकीट घोटाळ्याप्रकरणी मोठा खुलासा झाला आहे. तेलंगणा सीआयडीने केलेल्या तपासात हैदराबाद क्रिकेट असोसिएशनचे अध्यक्ष जगन मोहन राव (Jagan Mohan Rao) यांच्यासह पाच अधिकाऱ्यांना अटक करण्यात आली आहे. बुधवारी रात्री ही कारवाई करण्यात आली. या कारवाईत एचसीएचे खजिनदार सी. श्रीनिवास राव, सीईओ सुनील कांते, सरचिटणीस राजेंद्र यादव आणि त्यांची पत्नी कविता यांचीही चौकशी झाली आहे.

जनसुरक्षा विधेयकावरून राजकीय रणकंदन! नाना पटोलेंचा सरकारवर हुकूमशाहीचा आरोप

क्रिकेट प्रशासनावर मोठं प्रश्नचिन्ह

ब्लॅकमेलिंग आणि मोफत तिकिटांच्या तडजोडीवरून हे प्रकरण अधिक गंभीर बनले आहे. सनरायझर्स हैदराबाद फ्रँचायझीनेही यासंदर्भात बीसीसीआयकडे तक्रार नोंदवली होती. त्यांनी आरोप केला की, एचसीएकडून मोफत तिकिटांसाठी ब्लॅकमेलिंग करण्यात आली. या प्रकरणावर प्रतिक्रिया देताना माजी क्रिकेटपटू आणि काँग्रेस नेते मोहम्मद अझरुद्दीन यांनी तीव्र नाराजी व्यक्त केली आहे. ते म्हणाले की, क्रिकेट खेळणाऱ्यांपेक्षा क्रिकेट मोठा असतो. हे सगळं लज्जास्पद आणि न्यायालयीन आदेशांचा अवमान करणारे आहे.

खबरदार! ‘व्हॉट्सअप’वर ज्युनियर्सना त्रास दिला तर.. UGC चा गंभीर इशारा; नव्या नियमांत काय ?

दरम्यान, तेलंगणाचे मुख्यमंत्री ए. रेवंत रेड्डी यांनी या प्रकरणाची चौकशी करण्याचे आदेश दिले आहे. एचसीए अन् सनरायझर्स यांच्यातील वाद मिटवण्यासाठी 3,900 मोफत पास देण्याचा निर्णय घेतल्याची माहितीही समोर आली आहे. या कारवाईमुळे हैदराबाद क्रिकेट प्रशासनावर मोठं प्रश्नचिन्ह निर्माण झालं आहे.

 

follow us
  • fb
  • instagram
  • youtube