जनसुरक्षा विधेयकावरून राजकीय रणकंदन! नाना पटोलेंचा सरकारवर हुकूमशाहीचा आरोप

जनसुरक्षा विधेयकावरून राजकीय रणकंदन! नाना पटोलेंचा सरकारवर हुकूमशाहीचा आरोप

Nana Patole Criticizes Mahayuti Government On Public Security Bill : राज्य सरकारने सादर केलेल्या जनसुरक्षा विधेयकावरून (Public Security Bill) विधानसभेत मोठा राजकीय वाद निर्माण झाला आहे. या विधेयकाच्या विरोधात काँग्रेसचे आमदार नाना पटोले (Nana Patole) आणि एमआयएमचे नेते अबू आझमी यांनी तीव्र आक्रमक भूमिका घेतली आहे. या विधेयकाच्या माध्यमातून सरकार ( Mahayuti) विरोधकांचा आवाज दाबण्याचा प्रयत्न करत आहे, असा आरोप नाना पटोले यांनी केला आहे.

सरकार मात्र गँगवॉरमध्ये व्यस्त…

नाना पटोले म्हणाले की, आज राज्यात गोंधळ सुरू आहे. एकीकडे आमदार कँटीनमध्ये मारहाण करतात, गणपती विसर्जनात गोळ्या झाडल्या जातात. सरकार मात्र गँगवॉरमध्ये अडकलेलं दिसतं. त्यांनी उपस्थित प्रश्न केला की, एक आमदार कर्मचाऱ्याला ( Maharashtra Politics) मारतो, त्यामागे सरकारची बदनामी करण्याचा कट आहे का? त्याचबरोबर, जनसुरक्षा विधेयकावर बोलताना त्यांनी सरकारवर हल्लाबोल करत सांगितलं की, आमचं सरकारविरोधात बोलणं, मोर्चा काढणं आता गुन्हा ठरणार आहे काय? हे विधेयक म्हणजे लोकशाहीत हुकूमशाही आणण्याचा प्रयत्न आहे.

अधिवेशन सुरू असतानाच एकनाथ शिंदेंचा ‘सायलेंट स्ट्राइक’? अचानक दिल्ली गाठली, कारण…

सरकारचा हेतूच चुकीचा

अबू आझमी यांनीही विधेयकावर आक्षेप घेत सांगितलं, हे विधेयक मंजूर झालं नाही, पण सरकारचा हेतूच चुकीचा आहे. आधीच पोलिस सामान्यांना नग्न करून मारतात, आता हे विधेयक आल्यावर पोलिस बेलगाम होतील. ताडा कायद्यासारखी परिस्थिती निर्माण होईल. एक एफआयआर झाल्यावर सामान्य माणूस वर्षानुवर्षं केस लढत राहतो. विरोध करणाऱ्यांना तुरुंगात टाकण्याचं हे धोरण आहे.

विधेयकाविरोधात तीव्र भूमिका

सरकारकडून जनसुरक्षा विधेयकावर अद्याप स्पष्ट चर्चा झाली नसली तरी, विरोधकांच्या या आरोपांनी राज्याच्या राजकारणात मोठा खळबळ उडवली आहे. लोकशाही, अभिव्यक्ती स्वातंत्र्य आणि आंदोलना अधिकारांच्या संरक्षणासाठी विरोधकांनी या विधेयकाविरोधात तीव्र भूमिका घेण्याचे संकेत दिले आहेत.

संजय गायकवाडांना ‘सरकारची ढाल’! गुन्हा दाखलच होणार नाही; रोहित पवारांचा खळबळजनक दावा

काल प्रस्ताव मांडला. तूट सुधारणा मागितल्या आहेत. आम्हाला सरकारच्या विरोधात बोलायचा, मोर्चा काढायचा अधिकार नाही. त्या बिलावर आम्हाला चर्चा करू देणार नाहीत. नेमकं बिल काय आहे, हे आम्ही आता पाहू. लोकशाहीत हुकूमशाही चालू देणार नाही. आमच्या विरोधात बोललास तर नक्षलवादी ठराल असं सरकारचं धोरण आहे, अशी भूमिका पटोलेंनी मांडली आहे.

 

follow us
  • fb
  • instagram
  • youtube