Cricket News : सर्वाधिक सामने खेळणारे 3 यशस्वी कर्णधार; MS धोनीचा कोणता नंबर?

Cricket News : सर्वाधिक सामने खेळणारे 3 यशस्वी कर्णधार; MS धोनीचा कोणता नंबर?

Cricket News : क्रिकेटच्या कोणत्याही प्रकारात कर्णधाराची (Cricket News) भूमिका महत्त्वाची असते. कर्णधारावरच संघाची सगळी भिस्त असते. संघाचे नेतृत्व करण्याची मोठी जबाबदारी त्याच्यावर असते. ज्यावेळी संघ एखादा सामना किंवा मालिका जिंकतो त्यावेळी या यशाचे क्रेडिट कॅप्टनलाच दिले जाते आणि जर संघाने सामना गमावला तर या पराभवाचे खापरही कर्णधारावरच फोडले जाते. काही खेळाडू असे असतात जे कर्णधाराच्या जबाबदारीत चांगला खेळ करतात तर काही असेही खेळाडू असतात जे अपयशी ठरतात. सौरव गांगुली, एमएस धोनी, रिकी पाँटिंग, ग्रॅमी स्मिथ या खेळाडूंनी कर्णधार म्हणून त्यांच्या क्रिकेट कारकीर्दीत उल्लेखनीय यश मिळवले.

एखादा खेळाडू कर्णधार म्हणून चांगली कामगिरी करत असेल तर त्याला कर्णधार पदाची संधी सातत्याने मिळत राहते. असे काही खेळाडू आहेत ज्यांनी कर्णधार म्हणून सर्वाधिक क्रिकेट सामने खेळले आहेत.

Virat Kohli : ज्याची भीती होती तेच झालं! विराट कोहली इंग्लंडविरुद्धच्या मालिकेतून आऊट

रिकी पाँटिंग

रिकी पाँटिंग ऑस्ट्रेलियाचा (Rickey Ponting) एक यशस्वी कर्णधार होता. त्याच्या कर्णधार पदाच्या काळात कांगारू संघाने 2003 आणि 2007 या दोन वेळा विश्वचषक जिंकला होता. रिकी पाँटिंग याच्या नेतृत्वात जो ऑस्ट्रेलियाचा संघ होता तो अजिंक्य होता. या संघाला कुणीच पराभूत करू शकत नव्हते असे आजही सांगितले जाते. आकडेवारी जर पाहिली तर ही गोष्ट खरी असल्याचं सिद्ध होत. रिकी पाँटिंगने कर्णधार म्हणून 2002 ते 2012 या काळात एकूण 230 एकदिवसीय सामने खेळले. यापैकी 165 सामन्यात ऑस्ट्रेलियाचा विजय झाला तर 51 सामन्यात पराभव पत्करावा लागला.

स्टीफन फ्लेमिंग

न्यूझीलंडचा माजी कर्णधार स्टीफन फ्लेमिंग दुसऱ्या (Stephen Fleming) क्रमांकावर आहे. स्टीफन फ्लेमिंग सुद्धा त्याच्या काळात एक जबरदस्त कर्णधार म्हणून गणला जात होता. त्याच्या कप्तानीत न्यूझीलंडने अनेक महत्वाच्या सामन्यात शानदार विजयाची नोंद केली. 1997 ते 2007 या दहा वर्षांच्या काळात स्टीफन फ्लेमिंगने संघाचे नेतृत्व केले. या काळात कॅप्टन म्हणून त्याने 218 सामने खेळले यापैकी 98 सामन्यात किवी संघाला विजय मिळाला तर 106 सामन्यात पराभव पत्करावा लागला.

IND vs ENG : टीम इंडियाला धक्का! विराट, राहुल पाठोपाठ ‘हा’ स्टार फलंदाज मालिकेतून बाहेर?

एमएस धोनी

महेंद्रसिंह धोनी भारताचा सर्वात (MS Dhoni) यशस्वी कर्णधार आहे. त्याच्या नेतृत्वात टीम इंडियाने आयसीसीच्या तिन्ही ट्रॉफीवर नाव कोरले आहे. धोनीच्या नेतृत्वात भारतीय संघाने सर्वात आधी 2007 मध्ये टी 20 वर्ल्डकप जिंकला होता. त्यानंतर 2011 मध्ये तब्बल 28 वर्षानंतर वनडे वर्ल्डकप जिंकला होता. त्यानंतर 2013 मध्ये इंग्लंडचा पराभव करत चॅम्पियन ट्रॉफी सुद्धा जिंकली होती. धोनीच्या नेतृत्वात भारताने अनेक क्रिकेट स्पर्धात चांगले यश मिळवले. त्यामुळे धोनी भारताचा सर्वात यशस्वी कर्णधार ठरला. 2007 ते 2018 या कालावधीत धोनीने कर्णधार म्हणून 200 एकदिवसीय सामने खेळले. यातील 110 सामन्यात विजय मिळाला तर 74 सामन्यात पराभव पत्करावा लागला.

follow us
  • fb
  • instagram
  • youtube

वेब स्टोरीज