IND vs ENG : टीम इंडियाला धक्का! विराट, राहुल पाठोपाठ ‘हा’ स्टार फलंदाज मालिकेतून बाहेर?

IND vs ENG : टीम इंडियाला धक्का! विराट, राहुल पाठोपाठ ‘हा’ स्टार फलंदाज मालिकेतून बाहेर?

IND vs ENG Test Series : भारत आणि इंग्लंड दरम्यान भारतात पाच कसोटी (IND vs ENG Test Series) सामन्यांची मालिका सुरू आहे. या मालिकेतील तिसरा सामना येत्या 15 फेब्रुवारी रोजी सुरू होणार आहे. या मालिकेत आतापर्यंत दोन्ही संघांनी एक-एक सामना जिंकत बरोबरी साधली आहे. तिसऱ्या सामन्याआधी टीम इंडियाला (Team India) दुखापतीने ग्रासले आहे. केएल राहुल (KL Rahul) आणि रवींद्र जडेजा (Ravindra Jadeja) बाहेर पडले आहेत. विराट कोहलीही (Virat Kohli) पुढील सामन्यात खेळणार नाही. त्यानंतर आता आणखी एक धक्का बसला आहे.

भारतीय संघाचा मधल्या फळीतील स्टार फलंदाज श्रेयस अय्यर (Shreyas Iyer) कसोटी मालिकेतून बाहेर पडला आहे. अय्यरला काही दिवसांपासून पाठदुखीचा त्रास जाणवत आहे. त्यामुळे मालिकेतील उर्वरित सामन्यात तो खेळणार नाही हे आता निश्चित झालं आहे. दुसऱ्या कसोटीनंतर त्याने संघ व्यवस्थापनाला दुखापतीची माहिती दिली. फलंदाजी करताना पाठीवर ताण येत असल्याचे त्याने सांगितले.

श्रेयसला बऱ्याच दिवसांपासून पाठदुखीचा त्रास जाणवत आहे. मागील वर्षातील जानेवारी महिन्यातही ही समस्या उद्भवली होती. पाठीवर शस्त्रक्रिया करण्यात आली. त्यामुळे 2023 मधील टी 20 क्रिकेट लीगही तो खेळू शकला नाही.

IND vs ENG : बीसीसीआयने वजनावरून हिणवलेला सर्फराज अखेर टीम इंडियात ! संघात दोन मोठे बदलही

याबाबत बीसीसीआयने माहिती दिली आहे. श्रेयस अय्यरला पुन्हा पाठदुखीची समस्या जाणवू लागली आहे. त्यामुळे त्याला विश्रांती देण्याचा निर्णय घेण्यात आला आहे. यानंतर आता पुढील सामन्यात तो खेळणार की नाही हा प्रश्न निर्माण झाला आहे. बंगळुरू येथील राष्ट्रीय क्रिकेट अकादमीत तो डॉक्टरांच्या देखरेखीत राहणार आहे. टी 20 लीगपर्यंत तो तंदुरुस्त होईल अशी शक्यता आहे.

या मालिकेत त्याची कामगिरीही समाधानकारक राहिली नाही. फलंदाजीत तो अपयशी ठरला. त्यामुळे त्याच्यावर टीका करण्यात आली होती. तिसऱ्या कसोटीतील प्लेईंग 11 मध्ये त्याला संधी मिळण्याची शक्यताही कमीच होती. आता तर त्याच्या पाठदुखीचे कारणही समोर आले आहे. जर श्रेयस अय्यर पुढील सामन्यात खेळलाच नाही तर त्याच्या जागी नव्या खेळाडूला संधी द्यावी लागणार आहे. या खेळाडूची शोधाशोध सुरू करण्यात आली आहे. सर्फराज खान याला संधी मिळू शकते असे सांगण्यात येत आहे. संघ व्यवस्थापन कुणाला संधी देणार हे पाहणे महत्वाचे ठरणार आहे.

IND vs ENG: फिरकीचा डाव भारतावरच उलटला ! हैदराबाद कसोटीत इंग्लंडने हरविले

follow us
  • fb
  • instagram
  • youtube