Pakistan News : कंगाल पाकिस्तानला गुडन्यूज! ‘आयएमएफ’ने केली मोठ्ठी घोषणा

Pakistan News : कंगाल पाकिस्तानला गुडन्यूज! ‘आयएमएफ’ने केली मोठ्ठी घोषणा

Pakistan News : आर्थिक संकटाला तोंड देत असलेल्या पाकिस्तानला मोठी गुडन्यूज (Pakistan News) मिळाली आहे. आंतरराष्ट्रीय नाणेनिधी संघटनेने (IMF) पाकिस्तानला बेलआऊट पॅकेजअंतर्गत 1.1 बिलियन अमेरिकी डॉलरच्या कर्जाला मंजुरी दिली आहे. पाकिस्तानचे पंतप्रधान शाहबाज शरीफ यांनी (Shehbaz Sharif) आयएमएफ प्रमुख क्रिस्टालिना जॉर्जिवा यांच्याबरोबर चर्चा केली होती. यावेळी आयएमएफ प्रमुखांनी सांगितले होते की पाकिस्तानचे नागरिक संकटात आहे.

यानंतर संघटनेकडून पुन्हा कर्ज मंजूर करण्यात आले. पाकिस्तानच्या अर्थमंत्र्यांनी या वृत्ताला दुजोरा दिला आहे. परंतु, हे कर्ज कोणत्या कारणांसाठी दिले गेले याची माहिती त्यांनी दिली नाही. या पैशांच्या माध्यमातून देशाची आर्थिक परिस्थिती सुधारण्यास मदत होईल असे त्यांनी सांगितले.

Pakistan : घोषणा नाही, कारणही नाही तरीही ‘एक्स’ ठप्प; पाकिस्तानात सात दिवसांपासून चाललंय काय?

आयएमएफने सांगितले की पाकिस्तानची अर्थव्यनवस्था पुन्हा रुळावर आणण्यासाठी कठोर निर्णय घेण्याची आवश्यकता आहे. या संकटाच्या काळात आयएमएफने दिलेल्या कर्जासाठी पंतप्रधान शरीफ यांनी संघटनेचे आभार मानले आहेत.

याबाबत दिलेल्या अहवालानुसार, एसबीए अंतर्गत पाकिस्तानला 3 बिलियन अमेरिकी डॉलर्सचे कर्ज मिळाले आहे. आयएमएफचे उपप्रबंध निदेशक अँटोनेट सईह यांनी सांगितले की आता पुढील परिस्थिती सुधारण्यासाठी पाकिस्तानला कठोर परिश्रम घेण्याची गरज आहे. ठोस आर्थिक धोरणांवर काम करण्याची गरज पाकिस्तानला आहे.

बिजनेस रेकॉर्डच्या अहवालानुसार, पाकिस्तानला सध्याच्या परिस्थितीत देश चालविण्यासाठी 40 बिलियन अमेरिकी डॉलर्सची गरज आहे. परंतु, वस्तूस्थिती अशी आहे की पाकिस्तानला व्याजासह 30 बिलियन डॉलर्सचा कर्ज हप्ता जमा करायचा आहे. यामुळे पाकिस्तान सातत्याने कर्जाच्या जाळ्यात अडकत चालला आहे.

Pakistan : पाकिस्तानात महागाईचा भडका! पेट्रोल-डिझेलच्या किंमतीत ‘मोठ्ठी’ वाढ

अलीकडच्या काळात अमेरिकन डॉलरच्या तुलनेत पाकिस्तानी रुपया मजबूत झाला आहे. परंतु, त्याचा फायदा देशातील नागरिकांना होताना दिसत नाही. चलन मजबूत झाले तरीही पाकिस्तानला इंधन आयात शुल्क जास्तच द्यावे लागले. पहिल्या सहामाहीत पाकिस्तानी रुपया डॉलरच्या तुलनेत 0.25 वर पोहोचला आहे. म्हणजेच पाकिस्तानमध्ये एका डॉलरची किंमत 280 रुपये झाली आहे. याआधी एका डॉलरची किंमत 281 पाकिस्तानी रुपये इतकी होती.

follow us
  • fb
  • instagram
  • youtube