उसनवारीतही पाकिस्तानने मारली बाजी; जाणून घ्या, कर्ज घेणारे टॉप 5 देश कोणते?

उसनवारीतही पाकिस्तानने मारली बाजी; जाणून घ्या, कर्ज घेणारे टॉप 5 देश कोणते?

Pakistan Top 5 IMF Debtor : दहशतवादाला कायमच खतपाणी घालून पोसणारा पाकिस्तान (Pakistan) सध्या भीषण आर्थिक संकटात अडकला आहे. देशावर मोठे कर्ज झाले आहे. आता तर अशी परिस्थिती आहे की या कर्जाचे हप्ते भरण्यासाठी आणखी कर्ज घ्यावे लागत आहे. आता तर अशी बातमी येत आहे की पाकिस्तान जगातील चौथा सर्वात मोठा कर्जधारक देश बनण्याच्या मार्गावर आहे. पुढील नऊ महिन्यात पाकिस्तानला आणखी तीन अब्ज अमेरिकी डॉलर्सचे कर्ज मिळणार आहे. या कर्जानंतर पाकिस्तान जगातील चौथा सर्वात मोठा आयएमएफ (IMF) कर्जधारक देश बनेल. आधी पाकिस्तानचा नंबर पाचवा होता.

Elon Musk यांनी काढला नवा फतवा; आता twitter वर दिसणार केवळ ‘एवढ्याचं’ पोस्ट

पाकिस्तानी वृत्तपत्र द एक्सप्रेस ट्रिब्युनच्या रिपोर्टनुसार, पाकिस्तान स्वतंत्र झाल्यापासून आतापर्यंतच्या वाटचालीत सर्वाधिक वाईट आर्थिक संकटाचा सामना करत आहे. 31 मार्च 2023 रोजी आंतरराष्ट्रीय नाणेनिधी संघटनेच्या (आयएमएफ) सर्वाधिक उधार घेणाऱ्या देशांच्या यादीत पाकिस्तान पाचव्या क्रमांकावर होता. पण, आता पाकिस्तान चौथ्या क्रमांकावर येईल. हे कर्ज मिळणार असले तरी अद्याप काही कार्यवाही होणे बाकी आहे. त्यामुळे आणखी काही कालावधी यासाठी लागणार आहे. आठ महिन्यांच्या कालावधीनंतर हा करार प्रत्यक्षात आला आहे.

कर्जधारक टॉप 5 देश कोणते? 

आयएमएफकडून सर्वाधिक कर्ज घेणाऱ्या देशांच्या यादीत अर्जेंटीना पहिल्या क्रमांकावर आहे. या देशाने आयएमएफकडून 46 अब्ज डॉलर्स कर्ज घेतले आहे. इजिप्त दुसऱ्या क्रमांकावर आहे. या देशावर 18 अब्ज डॉलर्सचे कर्ज आहे. युद्धग्रस्त युक्रेन तिसऱ्या क्रमांकावर आहे. या देशाने 12.2 अब्ज डॉलर्स कर्ज घेतले आहे. इक्वाडोर देश चौथ्या क्रमांकावर असून या देशाने 8.2 अब्ज डॉलर्स कर्ज घेतले आहे. त्यानंतर पाकिस्तान 7.4 अब्ज अमेरिकी डॉलर्सच्या कर्जासह पाचव्या क्रमांकावर आहे. नवीन कर्ज मिळाल्यानंतर पाकिस्तान चौथ्या क्रमांकावर असेल.

तसे पाहिले तर आयएमएफचे 93 देशांवर कर्ज आहे. पहिल्या दहा कर्जधारक देशांच्या यादीत पाकिस्तानही सामील आहे. आताही 155 अब्ज डॉलर्सच्या उधारीत या देशांचा वाटा 71.7 टक्के आहे. यामध्ये विशेष गोष्ट म्हणज पाकिस्तान आशियातील सर्वात मोठा कर्जधारक देश आहे. रिपोर्टमध्ये असेही म्हटले आहे की 19 देश असे आहेत की ज्यांच्याकडे 1 अब्ज डॉलर्स किंवा त्यापेक्षा जास्त कर्ज आहे.

Vladimir Putin : रशियाचे राष्ट्राध्यक्ष पुतिन यांच्याकडून ‘मेक इन इंडिया’चे कौतुक

आयएमएफकडून कर्ज घेणाऱ्या अन्य देशांच्या यादीत श्रीलंका, नेपाळ, उज्बेकिस्तान, किर्गिज गणराज्य, आर्मेनिया, मंगोलिया या देशांचा समावेश आहे. मात्र हे देश पाकिस्तानच्या बाबतती खूप मागे आहेत. या देशांच्या तुलनेत पाकिस्तावर खूप जास्त कर्ज आहे.

Tags

follow us
  • fb
  • instagram
  • youtube