Elon Musk यांनी काढला नवा फतवा; आता twitter वर दिसणार केवळ ‘एवढ्याचं’ पोस्ट

Elon Musk यांनी काढला नवा फतवा; आता twitter वर दिसणार केवळ ‘एवढ्याचं’ पोस्ट

Elon Musk Limits on twitter Post : मायक्रोब्लॉगिंग साईट ट्विटरचे सीईओ एलॉन मस्क (Twitter CEO Elon Musk ) यांनी ट्विटरची मालकी घेतल्यानंतर अनेक धक्कादायक निर्णय घेतले आहेत. यामध्ये युझर्सच्या व्हेरीफाईड अकाऊंटची ओळख असलेल्या ब्लू टीक बाबात त्यांनी गेल्या काही दिवसांपूर्वीच महत्त्वाचा निर्णय घेतला होता. त्यानंतर आता त्यांनी आणखी एक महत्त्वाचा निर्णय घेतला आहे. त्यामुळे आता युझर्सना ट्विटरवर पोस्ट पाहण्यासाठी मर्यादा असणार आहेत. ( Twitter CEO Elon Musk impose Limits on twitter to reading post )

SBI मध्ये अकाउंट आहे तर या सुविधांचा अवश्य लाभ घ्या, जाणून घ्या मोफत काय मिळते?

ट्विटरवर गेल्या काही दिवसांपासून बॅकएंड बदलांमुळे युझर्सना अडचणींचा सामना करावा लागत होता. त्यामुळे आता एलॉन मस्क यांनी डेटा स्क्रॅपिंग आणि सिस्टम मॅनिप्युलेशन टाळण्यासाठी एक नवी घोषणा केला आहे, ती म्हणजे आता एका दिवसांत कोणत्या युझर्सना किती पोस्ट वाचता येणार यावर मर्यादा घालण्यात आल्या आहेत.

पॅन-आधार लिंकिंगसाठी मोठा दिलासा, जाणून घ्या कोणाला मिळणार फायदा

काय म्हणाले एलॉन मस्क?

ही घोषणा स्वतः एलॉन मस्क यांनी केली आहे. त्यांनी ट्विट करत ही माहिती दिली. त्यांनी दिलेल्या माहितीनुसार आता, ‘डेटा स्क्रॅपिंग आणि सिस्टम मॅनिप्युलेशन अंतर्गत आम्ही काही तात्पुरत्या मर्यादा लागू केल्या आहेत. त्यामुळे आता व्हेरीफाईड अकाऊंटला ट्विटरवर दिवसाला 6000 पोस्ट वाचता येतील. अनव्हेरीफाईट अकाऊंटला दिवसाला 600 पोस्ट वाचता येतील तर नव्या अकाऊंटला दिवसाला केवळ 300 पोस्ट वाचता येणार आहेत. पण या मर्यादा तात्पुरत्या असल्याचं देखील त्यांनी या ट्विटमध्ये म्हटले आहे.

दरम्यान अनेकांना आज सायंकाळपासून ट्विटरवर पोस्ट दिसने अचानक बंद झाल्याने, जगभरात ट्विटर डाऊन झाल्याची समस्या निर्माण झाली आहे. यानंतर लाखो युजर्संनी ट्विट रिफ्रेश होत नसल्याची तक्रार केली आहे. एलॉन मस्ककडे मालकी आल्यानंतर ट्विटर डाउन होण्याची ही तिसरी वेळ आहे. काही युजर्संनी ट्विटरची ही समस्या इतर सोशल मीडिया प्लॅटफॉर्मवर माहिती शेअर केली आहे.

Tags

follow us
  • fb
  • instagram
  • youtube