पॅन-आधार लिंकिंगसाठी मोठा दिलासा, जाणून घ्या कोणाला मिळणार फायदा

पॅन-आधार लिंकिंगसाठी मोठा दिलासा, जाणून घ्या कोणाला मिळणार फायदा

Pan-Aadhar Linking : 30 जून 2023 ही आधार कार्ड पॅनशी लिंक करण्याची शेवटची तारीख होती. आयकर विभाग लिंकिंग डेडलाइन वाढवणार की नाही याबद्दल अनेक तर्क लावले जात होते. सध्या, अंतिम मुदतीबाबत प्राप्तिकर विभागाकडून कोणतेही अपडेट आलेले नाही. परंतु प्राप्तिकर विभागाने शुक्रवारी उशिरा एका ट्विटमध्ये आधार लिंकिंगसाठी शुल्क भरल्यानंतर पॅन धारकांना चलन डाउनलोड करण्यात अडचणी आल्याचे सांगितले होते.

आयकर विभागाने आपल्या ट्विटमध्ये म्हटले आहे की अशी प्रकरणे समोर आली आहेत, जिथे पॅन-आधार लिंकिंगसाठी शुल्क भरल्यानंतर पॅनधारकांना चलन डाउनलोड करण्यात अडचणी येत असल्याचे दिसून आले आहे. अशा प्रकरणांसाठी, इन्कम टॅक्स पोर्टलवर लॉग इन केल्यानंतर ‘ई-पे टॅक्स’ टॅबमध्ये चलन पेमेंटची स्थिती तपासली जाऊ शकते. पेमेंट यशस्वी झाल्यास, पॅन धारक आधारशी पॅन लिंक करण्याची प्रक्रिया सुरु ठेऊ शकतात.

आयकर विभागाने दिलासा दिला
आयकर विभागाने ट्विटमध्ये म्हटले आहे की, ज्या प्रकरणांमध्ये पॅन कार्डधारकाने पेमेंट केले आहे आणि संमती दिली आहे, परंतु 30 जून 2023 पर्यंत लिंक केलेले नाही, त्यांच्या प्रकरणांचा विभागाकडून विचार केला जाईल आणि दिलासा दिला जाईल.

Twitter Down: ट्विटर पुन्हा डाऊन, लाखो युजर्स हैराण

चलन पावती डाउनलोड करण्याची गरज नाही
आयकर विभागाने सांगितले की, अधारला पॅन लिंक करण्यासाठी चलन पावती डाउनलोड करण्याची गरज नाही. विभागाने म्हटले आहे की पॅन धारकाने यशस्वी पेमेंट पूर्ण केल्यावर, त्यांना चालानच्या प्रतीसह एक ईमेल पाठविला जात आहे. अशा परिस्थितीत त्यांना ते वेगळे डाउनलोड करण्याची गरज नाही.

West Indies out of World Cup 2023: विश्वविजेता वेस्ट इंडिज, 48 वर्षांत प्रथमच विश्वचषकातून बाहेर

हे नियम आहेत
पॅनला आधारशी लिंक करण्याचा कायदा 1 जुलै 2017 पासून लागू झाला आहे. 30 जून 2023 ही लिंक करण्याची शेवटची तारीख होती. अशा परिस्थितीत, जर एखादी व्यक्ती 30 जून 2023 पर्यंत आपले आधार पॅनशी लिंक करू शकली नसेल आणि नंतरच्या तारखेला लिंक करू इच्छित असेल, तर आयकर विभागाला दंड भरल्यानंतर दोन्ही लिंक केले जाऊ शकतात.

Tags

follow us
  • fb
  • instagram
  • youtube