“आम्हाला पगार नको”, पाकिस्तानच्या पंतप्रधान अन् मंत्र्यांनी नाकारला पगार
Shehbaz Sharif and his cabinet will not take salary : पाकिस्तानसमोर सध्या मोठं आर्थिक संकट निर्माण झाले आहे. नव्या सरकारलाही या संकटाचा सामना करावा लागत आहे. या संकटातून मार्ग काढण्यासाठी सरकारकडून प्रयत्न केले जात आहेत. त्यात आता पंतप्रधान शाहबाज शरीफ (Shehbaz Sharif) आणि त्यांच्या मंत्रिमंडळातील मंत्र्यांनी एक मोठा निर्णय घेतला आहे ज्याची चर्चा जगभरात होत आहे. शाहबाज शरीफ आणि त्यांच्या मंत्रिमंडळातील सदस्यांनी पगार आणि अन्य लाभ घेणार नाही, असा निर्णय घेतला आहे. याआधी राष्ट्रपती असिफ जरदारी यांनीही पगार घेणार नसल्याचे जाहीर केले होते.
पाकिस्तानचा अफगाणिस्तानात एअर स्ट्राईक, 8 जणांचा मृत्यू; युद्धासारखी स्थिती, सैन्य आमनेसामने
पंतप्रधान कार्यालयाने या निर्णयाची माहिती निवेदनाद्वारे दिली आहे. अनावश्यक खर्च टाळण्यासाठी हा निर्णय घेण्यात आला आहे. नव्या मंत्रिमंडळाने याआधीच सरकार अनुदानित परदेश दौऱ्यांना आळा घालण्यासाठी उपाययोजना केल्या आहेत. त्यामुळे आता सरकारमधील मंत्री, खासदार आणि सरकारी अधिकारी परवानगी घेतल्याशिवाय सरकारी निधी वापरून परदेश दौरे करू शकणार नाहीत.
पाकिस्तान सरकारच्या या निर्णयाआधी राष्ट्रपती असिफ जरदारी यांनीही दरमहा पगार घेणार नाही असे जाहीर केले होते. यानंतर पाकिस्तान सरकारमधील गृहमंत्री मोहसीन नक्वी यांनीही पगार न घेण्याचा निर्णय जाहीर केला होता. यानंतर पंतप्रधानांवर नैतिक दबाव वाढला होता. पंतप्रधानही असाच निर्णय घेतील अशी अपेक्षा पाकिस्तानी नागरिकांकडून व्यक्त केली जात होती. त्यानुसार बुधवारी पंतप्रधान शरीफ आणि त्यांच्या मंत्रिमंडळातील मंत्र्यांनी पगार घेणार नसल्याचा निर्णय जाहीर केला.
Pakistan News : पाकिस्तानातील ग्वादर बंदरावर मोठा हल्ला; आठ दहशतवाद्यांचा खात्मा
पाकिस्तानचे माजी राष्ट्रपती अरिफ अल्वी यांना दर महिन्याला 8 लाख 46 हजार 550 रुपये पगार मिळत होता. ही रक्कम सन 2018 मध्ये संसदेने ठरवून दिली होती. मात्र महसुलावरील वाढलेला भार पाहता नव्या राष्ट्रपतींनी पगार घेणार नसल्याचे जाहीर केले होते.