तरुणांना नोकरी नाही फक्त घोषणा मिळणार,राहुल गांधींचा पंतप्रधान मोदींवर निशाणा

Rahul Gandhi On PM Modi : पंतप्रधान मोदी यांनी स्वातंत्र्यदिनानिमित्त आज लाल किल्ल्यावरुन देशाला संबोधित करत अनेक मोठ्या घोषणा केल्या आहे.

Rahul Gandhi On PM Modi

Rahul Gandhi On PM Modi

Rahul Gandhi On PM Modi : पंतप्रधान मोदी यांनी स्वातंत्र्यदिनानिमित्त आज लाल किल्ल्यावरुन देशाला संबोधित करत अनेक मोठ्या घोषणा केल्या आहे. तर आता लोकसभा विरोधी पक्षनेते राहुल गांधी (Rahul Gandhi) यांनी पंतप्रधान नरेंद्र मोदी (PM Modi) यांच्यावर या योजनेवरुन हल्लाबोल केला आहे. पंतप्रधान नरेंद्र मोदी यांच्याकडे कोणतेही विचार नाही त्यांच्याकडून तरुणांना फक्त घोषणा मिळतील नोकरी नाही. अशी टीका राहुल गांधी यांनी पंतप्रधान नरेंद्र मोदी यांच्यावर केली आहे. याच बरोबर राहुल गांधी एक्स वर संसदेच्या पावसाळी अधिवेशनादरम्यान कॉर्पोरेट व्यवहार मंत्रालयाला विचारलेल्या लेखी प्रश्नांची आणि त्यांच्या उत्तरांची एक प्रत शेअर केली आहे.

राहुल गांधी यांनी एक्स वर केलेल्या पोस्टमध्ये म्हटले आहे की, “एक लाख कोटी रुपये जुमला – सीझन 2. 11 वर्षांनंतरही मोदीजींचे तेच जुने नारे, तेच आकडे.” गेल्या वर्षी एक लाख कोटींमधून एक कोटी इंटर्नशिपचे आश्वासन देण्यात आले होते आणि या वर्षी पुन्हा एक लाख कोटी रुपयांची नोकरी योजना देण्याचे आश्वासन देण्यात आले. असं राहुल गांधी यांनी या पोस्टमध्ये म्हटले आहे.

पुढे राहुल गांधी यांनी या पोस्टमध्ये म्हटले आहे की, “सत्य काय आहे? संसदेत माझ्या प्रश्नावर सरकारने कबूल केले की 10 हजारांपेक्षा कमी इंटर्नशिप केल्या गेल्या. वेतन इतके कमी होते की 90 टक्के तरुणांनी नकार दिला.” त्यांनी आरोप केला की, “मोदीजींकडे आता कोणतेही नवीन विचार शिल्लक नाहीत. या सरकारकडून तरुणांना फक्त घोषणा मिळतील, नोकऱ्या नाहीत.”

तर दुसरीकडे आज 79 व्या स्वातंत्र्यदिनानिमित्त लाल किल्ल्यावरून देशाला संबोधित करताना पंतप्रधान मोदी यांनी “प्रधानमंत्री विकास भारत योजना” जाहीर केली, ज्याअंतर्गत खाजगी क्षेत्रात पहिली नोकरी मिळवणाऱ्या तरुणांना 15,000 रुपयांची प्रोत्साहन रक्कम दिली जाईल. या योजनेअंतर्गत एक लाख कोटी रुपयांची तरतूद करण्यात आली आहे आणि सुमारे 3.5 कोटी तरुणांना त्याचा लाभ मिळेल अशी माहिती देखील यावेळी पंतप्रधान नरेंद्र मोदी यांनी दिली.

चीनपेक्षाही RSS धोकादायक…, असदुद्दीन ओवैसींचा PM मोदींवर हल्लाबोल

मतचोरीचा आरोप

7 ऑगस्ट रोजी राहुल गांधी यांनी पत्रकार परिषद घेत भाजप आणि निवडणूक आयोगावर मत चोरीचा आरोप केला होता. या पत्रकार परिषदेमध्ये राहुल गांधी यांनी काही पुरावे देत पंतप्रधान मोदी आणि निवडणूक आयोगावर मत चोरीचा गंभीर आरोप केला. सध्या या प्रकरणावरुन राहुल गांधी यांनी पंतप्रधान नरेंद्र मोदी यांच्यावर जोरदार हल्लाबोल करत आहे.

Exit mobile version