डोनाल्ड ट्रम्प यांनी टॅरिफ वाढवलं; पंतप्रधान नरेंद्र मोदींचा रशियाच्या राष्ट्राध्यक्षांना फोन, घेतला मोठा निर्णय

डोनाल्ड ट्रम्प यांनी टॅरिफ वाढवलं; पंतप्रधान नरेंद्र मोदींचा रशियाच्या राष्ट्राध्यक्षांना फोन, घेतला मोठा निर्णय

PM Modi and Putin Talk on Phone : पंतप्रधान नरेंद्र मोदी आणि रशियाचे राष्ट्रपती व्लादीमीर पुतिन यांच्यामध्ये आज दूरध्वनीवरून महत्त्वाची चर्चा झाली. यावेळी व्लादीमीर पुतिन यांनी मोदींना (Modi) युक्रेनसोबत सुरू असलेल्या संघर्षासंदर्भात घडामोडींबद्दल माहिती दिली. सोबतच त्यांनी भारताची भूमिका देखील स्पष्ट केली. यावेळी बोलताना मोदी म्हणाले की, भारत नेहमीच वाद शांततापूर्ण मार्गाने सोडवण्याच्या बाजुनं उभा राहिला आहे, असं मोदी यांनी यावेळी म्हटलं.

रशिया आणि युक्रेनमध्ये युद्ध सुरू आहे. युक्रेनसोबत सुरू असलेलं युद्ध रशियानं थांबवावं म्हणून अमेरिकेकडून दबाव टाकला जात आहे. तर दुसरीकडे अमेरिकेनं भारताला देखील मोठा धक्का दिला आहे. अमेरिकेचे राष्ट्राध्यक्ष डोनाल्ड ट्रम्प यांनी भारतावर 50 टक्के टेरिफ लावण्याचा निर्णय घेतला आहे, मात्र यासारख्या आव्हानांना न जुमानता, भारत आणि रशियामधील धोरणात्मक संबंध मजबूत राहातील यावर यावेळी दोन्ही नेत्यांनी भर दिला.

परराष्ट्र धोरण विदेश दौरे काढण्यापुरतेच आहे का?, 25 टक्के टॅरिफवरून ठाकरेंचा मोदी सरकारला सवाल..

या चर्चेदरम्यान दोन्ही नेत्यांकडून द्विपक्षीय संबंधांच्या प्रगतीचा आढावा देखील घेण्यात आला आहे. तसेच भारत -रशिया धोरणात्मक भागीदारी आणखी दृढ केली जाईल, असा पुनरुच्चारही यावेळी दोन्ही बाजुने करण्यात आला. दरम्यान पंतप्रधान नरेंद्र मोदी यांनी रशियाचे राष्ट्रपती पुतिन यांना भारत भेटीचं निमंत्रण दिलं आहे. 23 व्या भारत -रशिया वार्षिक शिखर परिषदेसाठी पंतप्रधान नरेंद्र मोदी यांनी पुतिन यांना आमंत्रित केलं आहे. जागतिक स्थरावर सध्या ज्या घडामोडी घडत आहेत, त्या पार्श्वभूमीवर या चर्चेला अत्यंत महत्त्व प्राप्त झालं आहे.

रशियाचं युक्रेनसोबत युद्ध सुरू आहे, हे युद्ध सध्या निर्णायक मोडवर आहे, तर दुसरीकडे अमेरिकेनं भरतावर 50 टक्के टॅरिफ लावण्याचा निर्णय घेतला आहे. दरम्यान अमेरिकेनं भारतावर टॅरिफ लावण्याचा निर्णय घेतल्यानंतर चीन आणि रशिया भारतासोबत उभे राहिल्याचं चित्र दिसून येत आहे, चीनने देखील याविरोधात तीव्र नाराजी व्यक्त केली आहे, चीनने ट्विट करत आपली नाराजी दर्शवली.

follow us
  • fb
  • instagram
  • youtube